Jalyukt Shivar Yojana: जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्यात 231 गावांची निवड; जलआराखडे तयार करण्याचे काम सुरू

Jalyukta Shivar Yojana
Jalyukta Shivar Yojanaesakal
Updated on

Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवार योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करण्यात आली असून, आता या सर्व गावांचे जलआराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे.

तालुका पातळीवर मंजूर आराखडे जिल्हास्तरीय समितीकडून राज्य सरकारच्या मंजुरीनंतर कामे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. (Selection of 231 villages in the district for Jalyukt Shivar Yojana work of preparing water plan underway nashik news)

सरकारने पुन्हा जलयुक्त शिवार अभियान २.० ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, भूजल पातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे.

त्यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद् व जलसंधारण, पाण्याचा शाश्‍वत स्त्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत.

२०१५ ते २०१९ या काळात शासनाने जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद् व जलसंधारणाची सहा लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण करीत, २७ लाख टीएसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

नवीन योजनेनुसार प्रत्येक गावाचा जलआराखडा तयार करून गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे, अपधाव रोखणे आदी कामे केली जाणार आहेत.

तसेच पाणी साठवण्यासाठी शेततळे उभारणे, प्लॅस्टिक अस्तरीकरण करून पाणी साठवणे, सूक्ष्म सिंचन, मूलस्थानी जलसंधारण, सामूहिक पद्धतीने समन्याय तत्त्वाने सिंचन व्यवस्था करणे, पाणी साठवलेल्या प्रकल्पांवर शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचन व्यवस्थापन करणे आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

नव्या योजनेतून जलसाक्षरतेला प्राधान्य दिले जाणार आहे. या जलसाक्षरतेमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित कार्यकारी अभियंता तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र देऊन जलयुक्त शिवार २.० योजनेसाठी गावांची निवड करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalyukta Shivar Yojana
Nashik: देशामध्ये दशकात अन्नधान्य उत्पादनात शेतकऱ्यांनी केली 734 लाख टनाने वृद्धी; विक्रमी उत्पादनाचा अंदाज

जलयुक्त शिवारसाठी निवड झालेली तालुकानिहाय गावे

मालेगाव (२० गावे) : एरंडगाव, कंधाणे, कजवाडे, चिंचवे गा, ज्वार्डी खुर्द, ज्वार्डी बुद्रुक, वळवाडे, गारेगाव, झाडी, नागझरी, पोहाणे, रामपुरा, वऱ्हाणे, सावकारवाडी, हताणे निमशेवाडी, मोरदर, वळवाडी. खाकुर्डी, टिपे.

नांदगाव (१२) : धोटाणे बुद्रुक, नांदूर, लोंढरे, रोहिले बुद्रुक, डॉक्टरवाडी, गणेशनगर, पिंप्राळे, वाखारी, धनेर, भार्डी, चांदोरे, मनमाड.

चांदवड (२१) : इंद्रायवाडी, शिवाजीनगर, वाहेगावसाळ, कोकणखेडे, रापली, वागदर्डी, पिंपळद, तळवाडे, निमगव्हाण, वडनेरभैरव, शिवरे, बोराळे, दुधखेड, चिखलांबे, धोंडगव्हाण, धोतरखेडे, नवापूर, इंदिरानगर, खडकजांब, जैतापूर, भयाळे.

येवला (१६) : आहेरवाडी, एरंडगाव खुर्द, परंडगाव बुद्रुक, कानडी, कोटमगाव बुद्रुक, कोटमगाव बुद्रुक, खैरगव्हाण, गोपाळवाडी, नायगव्हाण, पिंपळखुटे खुर्द, बदापूर, भुलेगाव, मातुलठाण, रायते, लहीत, शिरसगाव लौकी.

देवळा (१४) : कापशी, कुंभार्डे, गिरणारे, गुंजाळनगर, फुलेमाळवाडी, अऊर, महालपाटणे, माळवाडी, लोहोणेर, वरवंडी, विठेवाडी, सटवाईची वाडी, सांगवी, सुभाषनगर.

निफाड (१६) : करंजगाव, कसबे सुकेणे, कोकणगाव, कोटमगाव, गोळेगाव, डोंगरगाव, थेरगाव, देवगाव, धारणगाव खडक, नारायणटेंभी, निमगाव वाकडा, बोकडदरे, वडाळीनजीक, वावी, विंचूर, सारोळे खुर्द.

सिन्नर (१५) : आशापूर, चापडगाव, सोनेवाडी, कृष्णनगर, कोमलवाडी, खंडागळी, गुरेवाडी, चोंढी, माळेगाव, मेंढी, देवपूर, निऱ्हाळे, पिंपरवाडी, फर्दापूर, वडगाव-सिन्नर, हरसूल.

दिंडोरी (१४) : गांडोळे, गोळशी, चिल्हारपाडा, करंजखेड, देहरे, पळसविहीर, मोखनळ, महाजे, श्रीरामनगर, शिंदपाडा, सावरपातळी, बोरवण

जालखेड, कोकणगाव बुद्रुक, वाघाड.

नाशिक (११) : गोविंदपूर, दोनवाडे, नाणेगाव, भगूर, राहुरी, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, शेवगेदारणा, संसारी, बेलतगव्हाण.

पेठ (१५) : आमडोंगरा, केळविहीर, खडकी, गावंध, डोंगरशेत, धुळघाट, फणसपाडा खुर्द, बोरधा, रायतळे, लव्हाळी, शेवखंडी, सादरपाडा (रा.), होमपाडा डोल्हारमाळ, चोखमुख.

बागलाण (१७) : जाखोड, जैतापूर, जोरण, नरकोळ, जुनी शेमळी, पठावे दिगर, भुयाणे, मानूर, वाडीचौल्हेर, बोढरी, चिराई, बहिराणे, वरचे टेंभे, खालचे टेंभे, इजमाने, मालेगाव भामेर, बिजोरसे.

कळवण (१५) : बगडू, भेंडी, भुसणी, बिजोरे, दयाणेदिगर, दरेगाव-हतगड, देसराणे, इन्शी, मोकभणगी, नाळीद, नांदुरी, नवी बेज, पिंपळ बुद्रुक, सावरपाडा, सुळे, विसापूर.

सुरगाणा (१५) : अंबाठा, अंबोदे, चिंचपाडा, दोडीचापाडा, गोंदुणे, हट्टी बुद्रुक, हेमाडपाडा, मांधा, मनखेड, पायरपाडा, पिंपळचोंड, रगतविहीर, राहुडे, उंबरपाडा, वांजूळपाडा, वाघाडपाडा.

इगतपुरी (१५) : अडसुरे बुद्रुक, बाहुली खुर्द, भंडारदरवाडी, भरवीर खुर्द, बॉबलेवाडी, धारणगाव, घोडेवाडी, चिचलखैरे, माणिकखांब आंदोळी, सातुर्ली, टाकेद बुद्रुक, शेवगेडांग, सोनोशी, बारशिंगवे.

त्र्यंबकेश्वर (१५ गावे) : बेहेडपाडा, दापूर, धाडोशी, हातलोंडी, कास, खंबाळे, खरोली, कोटांबी हरसूल, हुंब्याची मेट, मेटघर किल्ला, मुळवड, नांदगाव, राजीवनगर, सापगाव, शिंदपाडा.

Jalyukta Shivar Yojana
Chhagan Bhujbal: राममंदिरासह शिवमंदिरामध्ये ठीक, परंतु लोकशाही मंदिरात अपेक्षित नव्हता सोहळा : भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()