येवला : प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास अन कष्ट घेण्याची तयारी असली की यश दूर नसते...त्यासाठी कुठलाही स्पीड ब्रेकरचा अडथळा ठरत नाही हे सिद्ध केले आहे सायगाव (ता. येवला) येथील शेतकरी भूमिपुत्र नीलेश दारुंटे यांनी..! विशेष म्हणजे कोरोना काळातील लॉकडाऊनचे मोठे सहकार्य मिळाले. याच काळात अभ्यासाची एकाग्रता व इतरांचे मार्गदर्शन घेऊन या यशाचा पायाभरणी करता आल्याचे नीलेश सांगतो.
सायगाव येथील अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भूमिपुत्र नीलेश संजय दारुंटे हा जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे पाचवी ते बारावी पर्यत तर राहुरी येथून बी. टेक ॲग्री इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे घरात कोणीही उच्च शिक्षित नसून मार्गदर्शनाचा अभाव असताना जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळविले आहे. (Selection of Farmer's Son as Sub Inspector Nashik News)
मनाची जिद्द व अभ्यासाच्या चिकाटीच्या बळावर तो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिका येथे तयारी करीत होता. ऑगस्ट २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत तो राज्यात आठव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला. त्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकपदी निवड झाल्याने गावकऱ्यांसह अनेकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मेहनतीच्या जोरावर त्याने पुणे मुंबईत शिकवणी न लावता केवळ अभ्यासिकेत तासनतास बसून एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. या मेहनतीचे फळ त्याला मिळाले असून त्याच्या प्रयत्नांना यश आल्याने शेतकरी कुटुंबातील या भुमीपुत्राच्या निवडी बद्दल तालुक्यात व सायगाव परिसरात गावकऱ्यासह विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
या यशाबद्दल त्याचा स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत सत्कार करण्यात आला. यावेळी अभ्यासिकेचे संचालक तुषार शिंदे, राहुल जाधव, माजी सैनिक श्री. धनवटे आदी उपस्थित होते. दरम्यान, स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील यशवंत विद्यार्थी मेजर सुरेश धनवटे आणि मेजर विजय चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित अराजपत्रित गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील मंत्रालय, लिपिक टंकलेखक या पदासाठी निवड झाली आहे. त्यांचाही सत्कार करण्यात आला.
"अभ्यासात सातत्य आणि मनाची तयारी ठेऊन मी काम केले. परिस्थिती कितीही गरिबीची असली तरी प्रयत्न वाया जात नाहीत. लॉकडाऊन काळात मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. राहुरी कृषी विद्यापीठातील वातावरण देखील मला मार्गदर्शनासाठी मोलाचे ठरले. एवढ्यावरच न थांबता अजून परीक्षा देऊन उच्च पदाला गवसणी घालण्याचा मानस आहे."
- नीलेश दारुंटे, विद्यार्थी,सायगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.