पुणे विद्यापीठाच्या संघात नाशिकच्या अष्टपैलू रसिकाची निवड

all rounder cricketer rasika shinde
all rounder cricketer rasika shindeesakal
Updated on

नाशिक : येथील अष्टपैलू क्रिकेटपटू (All rounder cricketer) रसिका प्रदीप शिंदे हिची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University cricket team) संघात निवड झाली आहे. जयपूर (राजस्थान) येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय स्पर्धेत (inter-university national competition) ती विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्‍व करणार आहे. (Selection of Nashik all rounder Rasika shinde in team of Pune University Nashik News)

लोणावळा येथे झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेमध्ये रसिकाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर पुणे विद्यापीठाच्या संघात तिची निवड करण्यात आलेली आहे. यापूर्वीदेखील ऑल इंडिया वुमन्स लीग स्पर्धा शिरपूर (जि. धुळे) येथील सामन्यात रसिकाने अष्टपैलू कामगिरी केली होती. तिने तीन सामन्यांत नाबाद अनुक्रमे ६८, ३४ व ८४ धावा करून नाशिक संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. गेल्या दहा वर्षांपासून क्रिकेटमध्ये सातत्याने सराव करणाऱ्या रसिकाने उत्कृष्ट फलंदाजी, भेदक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून अष्टपैलू कामगिरी केलेली आहे.

all rounder cricketer rasika shinde
Nashik : विद्यार्थ्यांसाठी कोडिंग क्लब

आत्तापर्यंत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्ष, १९ वर्ष आतील स्पर्धेत तिची निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र संघात, राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तिची चार वेळा निवड झाली. त्यात दोन वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तिच्या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, मार्गदर्शक भावना गवळी, विनोद यादव, मोईनिष मुळे, प्रा. सोपान जाधव, भाविक मंकोडी आदींनी अभिनंदन केले आहे.

all rounder cricketer rasika shinde
Nashik : आंदोलनाला कार्यकर्ती, उमेदवारी मात्र घरच्यांना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.