Nashik : वरिष्ठ, निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा फज्जा

site is under maintenance alert
site is under maintenance alertesakal
Updated on

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : राज्यातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन (National Education Research) आणि प्रशिक्षण परिषदेकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षणाचा फज्जा उडाला आहे. सतत सर्व्हर डाऊन (server down) होणे आणि किचकट प्रक्रियेमुळे प्रशिक्षणार्थी हैराण झाले आहेत. पुढील आठवड्यात शाळा प्रारंभ आणि पावसाळा (Monsoon) तोंडावर असताना वेळ आणि इंटरनेट (Internet) उपलब्धता ही समस्या भेडसवण्याची भीती असतांना सुट्टीकाळात सर्व्हरने मान टाकल्याने राज्यभर प्रशिक्षणार्थी सैरभैर झाले आहेत. (Senior selection category online training chaos Nashik News)

राज्यातील शिक्षकांना बारा वर्षाच्या सलग सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी व चोवीस वर्षाच्या सलग सेवेनंतर निवड श्रेणी लागू होते. यासाठी प्रशिक्षणाची अट असते. पूर्वापार पद्धतीने राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद शिक्षकांना ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ मार्गदर्शकांकरवी ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देत असे. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना विभाग व जिल्हानिहाय देण्यात येई. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण संस्थगित होते.

एनसीआरटीने (NCERT) यावर्षी हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला राज्यभरातून ९०५०० कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून दोन हजार रुपये फी आकारण्यात अळी. प्रशिक्षण संस्थेने इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड (Infosys springboard app) या प्रतिथयश मानद संस्थेकडून घेण्याचे जाहीर करत ऍप्स डाउनलोड करण्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थीना नुकतेच १ जूनपासून सुरू झाले. हे प्रशिक्षण मात्र नमनालाच प्रशिक्षणार्थींचा घाम काढत आहे. तीस दिवसात ५० तासात प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. मात्र, दिवसभर लॉगीनच होत नाही. सतत सर्व्हर डाऊनचा संदेश झळकत असल्याने प्रशिक्षणार्थी वैतागले आहेत. २४ वर्षे सेवा झालेल्या निवड श्रेणीतील वयस्कर शिक्षकांना मोबाईलवर ऑनलाइनचे तंत्र धड काही जमत नाही. लॉगीनसाठी तंत्रस्नेहींची मदत घ्यावी तर ॲप्स थकलेले.

site is under maintenance alert
आषाढीवारीसाठी निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी मुरंबीची बैलजोडी ठरली मानकरी

ज्येष्ठांना या प्रशिक्षणाने पुरता वैताग आणला आहे. ऑनलाइन काम जमेना आणि मदतीला कुणी येईना, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यातच सर्व्हर डाऊन झाल्याने प्रशिक्षण अक्षरशः वैतागले आहेत. लॉगीनची किचकट प्रक्रिया, लॉगिन होण्यास प्रचंड त्रास, लॉगिन झालं तर स्वाध्याय अपलोड न होणे अशा समस्या येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत प्रशिक्षणाचा फज्जा उडाला आहे.

site is under maintenance alert
नाशिक : गिरणा धरणावरील 56 खेडी नळयोजना विस्कळीत

प्रशिक्षणार्थी वैतागले

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण घेतांना शासनाने प्रविष्ठ कर्मचाऱ्यांचे वय लक्षात घेऊन प्रशिक्षणाची सुलभ आखणी व सर्वसमावेशक कार्यप्रणाली राबवायला हवी अशी अपेक्षा होत आहे. आगामी आठवड्यात शाळा सुरु होत आहेत. दररोज सकाळी अकराला प्रशिक्षण सुरु होते. दोन सत्रात शाळेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेअभावी आणि दुर्गम भागात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंटरनेटअभावी प्रशिक्षण पूर्ण करता येणे शक्य नाही. यावर कुणीही मार्गदर्शन करत नाही. सुट्टीकाळात शासनाने काळापव्यय करून प्रशिक्षणाचा स्वतःहून फज्जा उडवला असल्याची टीका त्रस्त प्रशिक्षणार्थी करत आहे. या प्रश्‍नांवर शिक्षक आमदार व संघटना आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहे. शासनाने सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी होत आहे. ऑनलाइन प्रशिक्षण रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

"प्रशक्षणाची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. मेल न येणे, सर्व्हर डाऊन होत असल्याने आम्ही वैतागलो आहोत. मूळ उद्देश हरवलेले हे प्रशिक्षण ठरले आहे."

- किशोर शिंदे, सरचिटणीस, इंन्डिनेडंण्ट टीचर्स युनियन, नाशिक

"मुळात या प्रशिक्षणाची पूर्ण तयारी शासनाने केलेली नाही. कर्मचाऱ्यांचे वय, प्रशिक्षण पद्धती यात ताळमेळ नाही. कर्मचाऱ्यांचा अक्षरशः छळ होत आहे."

- दिगंबर नारायणे, प्रशिक्षणार्थी शिक्षक, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.