नाशिक : सार्वजनिक प्रसाधनगृहे, स्वच्छतागृहाची गरज तशी प्रत्येक नागरिकाला उद्भवते. परंतु त्यात उतार वयात असलेल्या ज्येष्ठांना विविध व्याधींमुळे प्रसाधनगृहांची निकड आवश्यकता असते. परंतु सध्या काही सुलभ शौचालयांकडून लघवीसाठीही पैसे आकारले जाता आहेत. असे असूनही प्रसाधनगृहांचा शोध घेताना ज्येष्ठ नागरिकांना मनस्तापला सामोरे जावे लागते आहे.
विविध कामांसाठी ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक कार्यालये, बँका व अन्य ठिकाणी बाहेर पडत असतात. अशात शहरातील बहुतांश ठिकाणी ज्येष्ठांना लघवी किंवा नैसर्गिक विधीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. बहुतांश ठिकाणचे सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने त्यांचा वापर करणे अशक्य बनले आहे. या ठिकाणी ओली जागा असल्याने ज्येष्ठ नागरिक सरकून पडण्याची भीती असते.
याशिवाय अस्वच्छतेचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. काही स्वच्छतागृहांमध्ये कर्मचारी नियुक्त असतात. परंतु अशा ठिकाणी लघवीसाठीही दोन ते चार रुपयांपर्यंत मागणी केली जाते. ज्येष्ठांच्या वयाचा विचार न करता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा केली जाते. अशात सार्वजनिक ठिकाणांवर ई-टॉयलेट सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
उद्यान, मैदानांजवळ हवे स्वच्छतागृहे बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिक उद्याने, मोकळ्या मैदानांजवळ आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा मारत बसतात. या ठिकाणी स्वच्छतागृहे नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असते.
आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती
ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयासोबत ग्रंथीशी निगडित व्याधी निर्माण होत असते. अशा वेळी वारंवार लघवी लागणे ही नैसर्गिक क्रिया असते. परंतु सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने अनेक वेळा लघवी रोखून धरावी लागते. अशा वेळी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण होते. मूत्रपिंडाचे, पोटाचे विकार उद्भवू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
ज्येष्ठांना उद्भवणाऱ्या अडचणी..
प्रसाधनगृहांच्या तोकड्या संख्येने शोधताना दमछाक
पैशांच्या आकारणीमुळे येतो आर्थिक भार
अस्वच्छतेतून आरोग्याचा प्रश्न गंभीर
अनेक ठिकाणी अरेरावीच्या भाषेचा होतो वापर
सार्वजनिक कार्यालयांत तळमजल्यावर नसते सुविधा
बहुतांश ठिकाणी भारतीय पद्धतीची बैठक असल्यानेदेखील होते गैरसुविधा
"सार्वजनिक ठिकाणांवर कामानिमित्त गेल्यावर प्रसाधनगृहांची गैरसोय होते. अनेक ठिकाणी सुविधा उपलब्ध नसते, तर बहुतांश ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी असते. प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांची समस्या लक्षात घेत आवश्यक उपाययोजना कराव्यात."
- शंकरराव खेलुकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.