मनमाड (जि. नाशिक) : पालिकेच्या शाळेत चौथीत शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षीय बेपत्तामुलाचा आज फिल्टर हाऊस जवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शरीराचे काही भाग कापलेल्या अवस्थेत आढळून आले असून बाजूलाच करवत सारखे हत्यार सापडले आहे. लोकेश सुनील सोनवणे असे मृत मुलाचे नाव आहे. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी याचा छडा लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. (sensation in Manmad city after the body of 9 year old boy found Nashik Latest Marathi News)
याबाबत माहिती अशी की आठवडे बाजारात असलेल्या एकलव्य नगरमध्ये राहणारा लोकेश सुनील सोमवणे (वय ९ वर्ष) हा काल शनिवारी सायंकाळी सायकल घेऊन फिरायला गेला असता तेव्हापासून बेपत्ता झाला होता. काही वेळाने मूल आले नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो मिळून आला नसल्याने याबाबत रात्री पोलिसात हरवल्याची तक्रार ही आई-वडिलांनी दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी परिसरासह बाहेरगावी लोकेशला रात्रभर शोध सुरू ठेवला होता.
तरीही तो मिळून आला नाही. मात्र आज गुरुवारी सायंकाळी मनमाड रेल्वेच्या हद्दीतील जलशुद्धी केंद्राजवळ असलेल्या पुणे लोहमार्गाशेजारी झाडाझुडपात त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र मारेकऱ्याने मृतदेहाचा उजवा हात व करंगळी कापलेली व चेहऱ्यांवर ओरखडे ओढल्याचे आढळून आले आहे. मृतदेहाजवळ करवतही आढळून आल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकेश काल सायकल खेळत असतांना गायब झाला होता. रात्री उशिरा शहर पोलिसांत तो हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती आज. अचानक त्याचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला.
अद्यापही हत्येमागे नेमके काय कारण हे अस्पष्ट असून त्याची सायकलही गायब आहे. शहर व लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. तर मनमाड शहर पोलिसांनी एका संशियास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. खून झालेल्या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, लोहमार्गाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे, लोहमार्ग निरीक्षक शरद जोगदंड, प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक शिरीष ढेंगे, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर यासह शहर तसेच रेल्वे, सुरक्षा पोलीस उपस्थित होते.
खून झालेला लोकेश हा येथील नेहरू भवन मागील पालिकेच्या शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकत होता. नऊ वर्षीय असलेला लोकेश रोज भाड्याची सायकल घेऊन सदर परिसरात फिरवत असे. आज दुपारी सायकल घेऊन फिरायला गेलेला लोकेश घरी आलाच नसल्याने लेकराच्या शोधासाठी कुटुंबीय आणि त्यांचे मित्रमंडळी शोधाशोध घेत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.