Nashik News: अबब! सातशेचा फायर बॉल 7 हजार रुपयांत! अग्निशमन विभागाकडून खरेदीचा प्रस्ताव सादर

Fire Ball
Fire Ballesakal
Updated on

नाशिक : महापालिकेकडून दोन वर्षांपूर्वी आग लागेल असे गृहीत धरून १३९१ बसविलेले फायर बॉल अद्यापही धुळखात पडून असताना आता अग्निशमन विभागाने पुन्हा नव्याने २५७ फायर बॉल खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

विशेष म्हणजे ७०० रुपयाला मिळणारा हा फायर बॉल अग्निशमन विभागाने तब्बल ७०८० रुपयांना खरेदी करण्याची तयारी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Seven hundred fire ball for 7 thousand rupees Submit purchase proposal from Fire Department NMC Nashik News)

महापालिकेकडून दोन वर्षांपूर्वी ८९ लाख रुपये खर्च करून १३९१ फायर बॉल खरेदी करण्यात आले. फायर बॉल खरेदी करताना गाजावाजा होवू नये म्हणून जादा विषयांमध्ये प्रस्ताव घुसविण्यात आला.

महापालिकेच्या मुख्यालयात विभागीय कार्यालयांमध्ये लाल रंगाचे बॉलच्या आकाराचे फायर बॉल जागोजागी लटकवलेले दिसतात. मात्र, एकाही फायर बॉलचा उपयोग झाला नाही. दोन वर्षांपूर्वी १३९१ फायर बॉल महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये विविध ठिकाणी बसविण्यात आले होते.

त्या वेळी सहा हजार ३८८ रुपयांना फायर बॉल खरेदी करण्यात आला. आता पुन्हा महापालिकेचे रुग्णालय व प्रसूती गृहांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे कारण पुढे करत १८ लाख १९ हजार रुपयांचे २५७ फायर बॉल खरेदी करण्याची तयारी करण्यात आली आहे. एका फायर बॉलची किंमत ७८० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Fire Ball
Vanchit Bahujan Aghadi | नाशिक मनपात ‘वंचित’ला हव्यात पन्नास जागा : अविनाश शिंदे

अग्निशमन विभागाचा होऊ द्या खर्च

वास्तविक महापालिका मुख्यालयात अग्निरोधक यंत्रणा बसविलेली आहे. असे असतानादेखील फायर बॉल खरेदी करून होऊ द्या खर्च, असे धोरण अग्निशमन विभागाने अवलंबिले आहे. दोन वर्षांपूर्वी १३९१ फायर बॉल खरेदी करण्यात आले.

त्यातील एकाही फायर बॉलचा उपयोग झालेला नाही. जे फायर बॉल बसविण्यात आले. त्याची गुणवत्तादेखील सुमार दर्जाची असल्याचे समोर आले आहे. असे असताना आता पुन्हा फायर बॉल खरेदी केले जात आहे.

ऑनलाइन फायर बॉलची किंमत ७०० रुपये असताना महापालिकेने ७०८० रुपये प्रतिनग असा दर निश्चित करून निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Fire Ball
Trimbakeshwar Maha Shivratri : त्र्यंबकेश्‍वरमध्ये महाशिवरात्रीला मिरवणुकीने ज्योतिर्लिंगाचे दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.