Nashik News : ऐन उन्हाळ्यात मनमाड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. पालिकेच्या वतीने महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होत असून पाण्यासाठी मनमाडकरांची वणवण सुरु झाली आहे.
त्यामुळे अनेकांनी तहान भागविण्यासाठी खासगी टँकरचा सहारा घेतला आहे. (Severe water shortage in Manmad city nashik news)
वाघदर्डी धरणात सध्या पाणीसाठा कमीप्रमाणात शिल्लक असल्यामुळे शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. आता ऐन उन्हाळ्यात मनमाडकरांच्या घशाला कोरड पडली आहे. पालखेड धरणाचे घेतलेले आवर्तन १५ ते १८ दिवसाआड पाणीपुरवठा करून आतापर्यंत पुरविले.
मात्र आता भर उन्हाळ्यात वाघदर्डी धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला असल्याने हे पाणी पुरेल की नाही याची शाश्वती नाही.त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मनमाडकर चिंतेत सापडला असून पाणी आणावे तरी कुठून असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
पाटोदा येथील साठवण तलावही कोरडाठाक पडला आहे. २२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे घरात साठवून ठेवलेले पाणी पुरत नाही. त्यामुळे पाणी भरण्यासाठी शहरातील विविध जलकुंभावर अथवा बोअरवेल, हातपंपावर महिलांची गर्दी होत आहे. तर ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही अशा ठिकाणी नागरिकांना विकतचे पाणी घेऊन पाण्याची गरज भागवावी लागत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाणी विक्रीचा धंदा जोरात
शहरातील व परिसरातील काही विहिरींवरून, तसेच अन्य ठिकाणावरून मोठ्या टाक्या, पाण्याचे टँकर भरून पाणी आणून विकले जात आहे. पाणी पाहिजे, फोन करा, टँकर व अन्य साधन तुमच्या दारात उभे, तीनशे ते पाचशे रुपयांत हजार लिटरची टाकी भरून दिली जाते पाचशे, हजार, दीड हजार, दोन हजार अशा किमतीला पाणी विकण्याचा धंदा जोरात सुरु आहे.
पूर्वी पाणी देणे हे पुण्याचे काम समजले जाई, मात्र आता तो व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय मनमाड शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे विकले जाणारे पाणी आणले जाते कुठून? याचा शोध घ्यायला पालिका प्रशासनाला रस नाही. पालिका प्रशासनाने पाणी विक्रीचे स्रोत अधिग्रहण करून शहराला मोफत पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात आहे.
पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना खोडा ...
पालखेड धरणात हक्काचे मुबलक पाणी आरक्षित असताना देखील केवळ वेळेवर पाणी न देणे, जे दिले तेही कमी पाणी देणे, मोठ्या प्रमाणात होणारी पाणी चोरी, संबंधित विभागाचा मनमानी कारभार व दुजाभावापणामुळे सव्वालाख नागरिकांना नेहमीच पाणीबाणीचा सामना करावा लागतो.
पालिकेला आवर्तनाचे पाणी जपून वापरावे लागते. मागे मिळालेल्या आवर्तनाच्या पाण्यातून पालिकेने शहराला १५ ते १८ दिवसाआड पाणी पुरवठा करत पाणी पुरविले मात्र धरणातील पाणीसाठा संपत आल्याने शहरात भीषण पाणीबाणी निर्माण झाली आहे.
बोअरवेल कोरडे पडण्याच्या मार्गावर
शहराला सध्या पाणीपुरवठा महिन्यातून एकदा होत आहे. त्यामुळे घरात साठवलेले पाणी पुरत नाही. मात्र शहरातील सर्वच वसाहतीमध्ये नागरिकांनी घरात बोअरवेल केल्यामुळे अनेकांना पाणी पुरत असते. मात्र उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील पाणीसाठा कमी होऊ लागला असून अनेक बोअरवेल कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.