नाशिक : एकीकडे उत्तरेकडील गंगेच्या धर्तीवर ‘दक्षिणगंगा’, अशी बिरुदावली मिळविलेल्या गोदावरीच्या गटारमुक्त, प्रदूषणमुक्तीच्या केवळ वल्गना केल्या जातात. दुसरीकडे गंगाघाटावरील अनेक गटारींचे पाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याचे चित्र आहे. (Sewage water directly into Ganga Nashik Latest Marathi News)
गंगेच्या धर्तीवर गोदावरीही प्रदूषणमुक्त व्हावी, म्हणून महापालिकेसह अन्य आस्थापना प्रयत्नशील असताना, गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर गटारी मिसळत असल्याचे दिसून येते.
महत्त्वाचे म्हणजे एकीकडे गंगाघाटावर स्मार्ट सिटीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, ते पाणीही गोदापात्रात मिसळत आहे. मध्यंतरी महापालिका प्रशासकांसह स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी गोदाघाटाचा दौरा केला, तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली का, असा संतप्त सवाल स्थानिकांसह येथील व्यावसायिकांनी केला आहे.
स्वच्छतागृहातील पाणी थेट गोदेत
रामसेतूखाली स्वच्छतागृह बांधण्यात आले असून, सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील मलमूत्र थेट गोदापात्रात मिसळत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही मलमूत्र गेल्या कित्येक वर्षांपासून गोदापात्रात मिसळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. रोकडोबा हनुमानासह मुक्तेश्वर महादेव मंदिर परिसर, रामसेतूच्या खालील भाग, यशवंतराव महाराज पटांगण व काझीच्या गढीचा खालील भाग या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात गटारी मिसळतात.
एकीकडे ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’च्या वल्गना केल्या जातात. गंगेच्या धर्तीवर गोदावरीचा विकासाचे स्वप्न दाखविले जाते. दुसरीकडे गंगाघाटावर अनेक गटारी नदीपात्रात मिसळतात.
-सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ, पंचवटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.