'शहापूरला भावली धरणाचे पाणी जाऊ देणार नाही' - नरहरी झिरवाळ

Jal Pujan of Bhavli Dam by Narhari Zirwal
Jal Pujan of Bhavli Dam by Narhari ZirwalSYSTEM
Updated on

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्याची जलवाहिनी समजल्या जाणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील बांधवांनी मोठा त्याग केला आहे. त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासीयांनाच मिळेल. त्यामुळे शहापूरला भावली धरणाचे पाणी जाऊच देणार नाही, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भावली येथे जलपूजन करताना दिला. (Shahapur will not be given water from Bhavli dam Assembly Vice President Narhari Zirwal warned)

तालुक्याला लाभलेले निसर्गाचे वरदानच म्हणावे असे, दाट धुके, धबधबे, मुसळधार पाऊस आणि या पावसातच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२९) जलपूजन करण्यात आले. तालुक्यातील पहिलेच भावली धरण चार दिवसांपूर्वी ओहरफ्लो झाले असून, आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हणाले, की गतवर्षी भावली येथील पर्यटनासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून, कोरोना महामारीत राज्य सरकारला अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तो निधी आगामी काळात माझ्या माध्यमातून आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्यातून पर्यटनमंत्री यांची भेट घेऊन भावली धरणासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

Jal Pujan of Bhavli Dam by Narhari Zirwal
नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

खोसकर म्हणाले, की भावली धरण परिसरातील नयनरम्य दृश्य, कोसळणारे धबधबे, धुक्याची चादर, ढगांचे कडे व कोसळणारा पाऊस येथील हा येथील निसर्गरम्य परिसर आहे. येथे पर्यटन विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. तालुक्यातील धरणातून शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी काँग्रेसचे संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, गोरख बोडके, जनार्दन माळी, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, रामदास धांडे, बाळासाहेब गाढवे, अनिता घारे, भरत आराटे, किरण मुसळे, हरीश्‍चंद्र चव्हाण, पिके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, भाऊराव भागडे, पोपटराव भागडे, अरुण गायकर, कैलास घारे, वसीम सय्यद, महेश शिरोळे, नारायण वळकंदे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.

(Shahapur will not be given water from Bhavli dam Assembly Vice President Narhari Zirwal warned)

Jal Pujan of Bhavli Dam by Narhari Zirwal
नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.