NMC News : महापालिकेत अभियंता वर्गात नगररचना विभागात कार्यरत असलेले संजय अग्रवाल यांच्या एकाधिकारशाहीला पुणे महानगर विकास प्राधिकरणावर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या प्रशांत पगार यांच्या पुनर्प्रवेशाने दणका बसला आहे.
पगार हे आता अग्रवाल यांची जागा घेणार असून अग्रवाल यांच्याकडे मलनिस्सारण विभागांसह अन्य विभागांचा पदभार दिला जाणार असल्याचे वृत्त आहे. (Shake monopoly of engineers in municipal corporation nashik news)
महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून अभियंत्यांमध्ये मोठ्या पदावर जाण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेत पुढे राहण्यासाठी साम-दाम-दंड या तत्त्वाचा वापर केला जातो हे आता लपून राहिले नाही. नगररचना विभागात कार्यरत असलेले संजय अग्रवाल अभियंता संवर्गात सर्वार्थाने ताकदवर मानले जातात.
अग्रवाल यांच्या मर्जीतल्या अभियंत्यांचा एक मोठा वर्ग महत्त्वाच्या पदावर सध्या कार्यरत आहे. अग्रवाल यांची ताकद वाढतं असतानाच यापूर्वी महापालिकेत कार्यरत असलेले व पुणे महानगर विकास प्राधिकरणावर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या प्रशांत पगार यांची मुळ सेवेत म्हणजे महापालिकेत पुन्हा बदली झाली आहे.
पगार यांच्या एंट्रीने अग्रवाल व त्यांच्या गटाला हादरा बसला आहे. पगार यांच्याकडे लवकरच नगररचना विभागाचा पदभार येणार असल्याने या विभागात सध्या कार्यरत असलेले व अग्रवाल गटाचे अभियंते चिंतेत आहे. अग्रवाल यांच्यानंतर त्यांच्या जागेवर बसण्यासाठी इच्छुक असलेल्या अभियंत्यांनाही पगार यांच्या एंट्रीने दणका बसला आहे.
अन्य अभियंत्यांची माघार
अधिक्षक अभियंता पदावरून उदय धर्माधिकारी ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहे. धर्माधिकारी यांच्याकडे मलनिस्सारण, यांत्रिकी, पाणीपुरवठा, विद्युत या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार होता. आता तो कार्यभार अग्रवाल यांच्याकडे येणार असल्याचे वृत्त आहे. अग्रवाल हे त्या पदावर बसणार असल्याने अन्य अभियंत्यांनी माघार घेतल्याचे समजते.
शहर अभियंता पदासाठी फिल्डिंग
कार्यकारी अभियंता पदावर तीन वर्षे काम केल्यानंतर अधिक्षक अभियंता या पदावर पदोन्नती होते. अग्रवाल यांना कार्यकारी अभियंता पदावर दीड वर्षे काम करावे लागणार आहे. अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती झाल्यानंतर महापालिकेत सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा बांधकाम विभागात शहर अभियंता म्हणून कार्यरत होणार असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.