Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज अपक्ष, हेमतं गोडसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तर उद्धव ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे मैदानात आहेत.
Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha
Shantigiri Maharaj Nashik Lok Sabhaesakal
Updated on

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह आठ राज्यातील 49 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 695 उमेदवार रिंगणात आहेत. 82 उमेदवार म्हणजेच 12 टक्के महिला राजकीय पटावर आपले नशीब आजमावत आहेत. नाशिकमध्ये देखील मतदानाला सुरुवात झाली आहे.

नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज अपक्ष, हेमतं गोडसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तर उद्धव ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे मैदानात आहेत. नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान सकाळी 7 वाजता मतदान सुरु झाल्यानंतर शांतीगिरी महाराज यांनी पहिला मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

तक्रार झाली तर शांतिगीरी महाराज यांच्या अडचणीत वाढ होवू शकते. यापूर्वी महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ईव्हीएम मशीनची पुजा केली होती. त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता शांतिगीरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha
Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, यंदा लढायचे आणि जिंकायचे. विजय निश्चितच आमच्या बादली चिन्हाचा होणार आहे, असा दावा शांतीगिरी महाराजांनी केला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे. योग्य उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन देखील शांतिगिरी महाराजांना दिले आहे.

हार का घातला?

मतदान पवित्र आहे. या यंत्राजवळ येऊन मतदान करणार आहेत. सर्वांना सद्बुद्धी व्हावी. आपलं मत भारत मातेच्या कामात यावा, म्हणून पवित्र हार आम्ही इव्हीएम मशिनला घातला असल्याचे शांतिगिरी महाराजांनी सांगितले. 

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha
Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.