Nashik Political: शांतिगिरी महाराज उतरणार लोकसभा आखाड्यात! जय बाबाजी भक्त परिवाराकडून नाशिकसह 7 जागा लढण्याचा निर्धार

प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सरसावला असून राज्यभरातील भाविक प्रचारासाठी नाशिकला येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharajesakal
Updated on

नाशिक : जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत सात मतदारसंघांत सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना देशभक्तीसाठी, राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सर्वानुमते झाल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सोमवारी (ता.२९) शासकिय अतिथीगृहातील पत्रकार परिषदेत दिली. (Shantigiri Maharaj will land in Lok Sabha area Jai Babaji Bhakt Pariwar decided to contest 7 seats including Nashik Nashik Political)

आगामी काही दिवसांत लोकसभेसह विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. यासाठी अनेकजण तयारी करीत असून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय त्यांच्या भक्त परिवाराने घेतला आहे.

त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सरसावला असून राज्यभरातील भाविक प्रचारासाठी नाशिकला येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भक्त परिवाराच्या आग्रहाखातर व काळाची गरज म्हणून परिवाराने शांतीगिरी महाराजांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Shantigiri Maharaj
Nashik News : जिल्ह्यातील घरकुलांची पथकाकडून पाहणी! अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या यंत्रणेला सूचना

अशा आहेत सात जागा

भक्त परिवार नाशिक छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, दिंडोरी, अहिल्या देवीनगर अशा सात लोकसभा मतदारसंघात नि:स्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी होणार आहे.

भक्त परिवाराचे जिल्ह्यात मोठे काम आहे. त्यामुळे शांतीगिरी महाराजांचा जिल्हाभरातील तब्बल २४ लाख मतदारांशी थेट संपर्क आहे.

महाराजांनी हा भाग व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केल्याने नाशिककर या भूमीपुत्राला प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्‍वास विष्णू महाराज यांनी व्यक्त केला.

येथील हनुमान जन्मस्थळासह अन्य मागे पडलेल्या विषयांना त्यामुळे चालना मिळेल, असा विश्‍वासही विष्णू महाराज यांनी व्यक्त केला.

Shantigiri Maharaj
NMC Clean Survey: महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सुरवात! जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या नृत्य, पथनाट्य स्पर्धा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.