Inspirational : मॅरेथॉन जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगत तो धावतोय; रोज 30 किलोमीटर पायी प्रवास

Sharad Gobhale
Sharad Gobhaleesakal
Updated on

नाशिक : वाजवड (ता. पेठ) या दुर्गम पाड्यावरील धावपटू शरद गोभालेचा रोजचा तीस किलोमीटरचा पायी प्रवास असतो. तो १० किलोमीटर अंतर ३८ मिनिटांमध्ये पार करतो. मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न उराशी त्याने बाळगले असून रोजंदारी करणारे वडील अन भाऊ त्याच्या शिक्षणाचा खर्च करताहेत. (sharad gopale of wajid running with dream of winning marathon Daily 30 km walking Nashik news)

लहानपणापासून ॲथलेटिक्सची आवड असलेल्या शरदने शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वलस्थान पटकावले. त्याने हरसूल येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरुनही त्याला शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत एकीकडे शिक्षण सुरु ठेवत दुसरीकडे मॅरेथॉन जिंकण्यासाठी त्याचा धावण्याचा सराव सुरु आहे. शरदचा दिवस रोज भल्या पहाटेपासून सुरु होतो.

घरातील कामे उरकून तो हरसूलकडे पायी निघतो आणि महाविद्यालयात पोचतो. हरसूल ते दलपतपूर पाड्यापर्यंत त्याचा धावण्याचा सराव करतो. धावण्यासाठी लागणारे साहित्य नसल्याने त्याचा पाय अनेकदा दुखावला आहे. निसर्गराजीच्या सहाय्याने त्यावर उपचार करतो. एका देणगीदारांनी त्याला धावण्याचे बूट दिले.

Sharad Gobhale
Nashik News : कलावंतांनी साधला ‘एकदम कडक’ संवाद; 2 डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

महाविद्यालयात सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत शिक्षण घेतल्यावर साडेतीनपर्यंत वाचनालयात अभ्यास करतो. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत धावण्याचा सराव करतो आणि त्याचा घरचा प्रवास सुरु होतो. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांची प्रेरणी घेऊन आदिवासी तरुण क्रीडा क्षेत्रात यश मिळवताहेत. हरसूलमध्ये ५५ खेळाडू सराव करताहेत. एकमेकांच्या अडचणीला धावून जातात. या खेळाडूंना प्रशिक्षक हिरकुड आणि शेंडे हे एक रूपया मानधन न घेता शिकवतात. सध्या शरदचा १० किलोमीटर अंतर ३५ मिनिटांमध्ये पार करण्याचा सराव सुरु आहे.

"हरसूल येथील महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. आमच्या गावात बसगाडी येत नसल्याने पायी हरसूलमध्ये यावे लागते. रस्ता खराब असल्याने चालताना पाय मुरगळतो. सराव करण्यासाठी पन्नास मुले रोज येतात. मॅरेथॉनमध्ये सहभागी होवून ती जिंकण्याची माझे स्वप्न आहे. आता सर्व आदिवासी खेळाडूंना शासन आणि प्रशासनाची मदतीची आवश्‍यकता आहे."

- शरद गोभाले (धावपटू)

Sharad Gobhale
Nashik : रामतीर्थ सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची व्हावी स्थापना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()