Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवार) मुंबईत रोड शो घेतला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमुळे लोकांना त्रास झाल्याचे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी कांद्यासाठी काय केलं, असे मोदी म्हणाले. यावर शरद पवारांनी उत्तर दिलं. मोदी मी काय केलं विचारतात. त्यांचा १० वर्षाचा अनुभव बघा. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या राज्यातील शेतीचा कोणताही विषय असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे.
एकदा असं झालं की मी इस्त्राइलला जात होतो आणि मोदींनी मला फोन केला. कारण त्यांचा विझा नाकारला होता. त्यांनी सांगितलं मला ईस्त्राइलला येऊन सर्व अभ्यास करण्याची इच्छा आहे. त्यावेळी मी त्यांना घेऊन गेलो होतो. ईस्त्राइलचं शेती तंत्रज्ञान सर्व गोष्टी त्यांना चार दिवस दाखवल्या. हे सगळं माहित असताना मोदी बोलतात म्हणजे ते फक्त राजकारण करत असल्याची टीका शरद पवार यांनी केली.
नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गेलेला आहे. त्यामुळे ते जाती धर्मावर बोलतात. मुख्यमंत्री असताना त्यांना शेतीचे प्रश्न पडायचे आता त्यांना पडत नाहीत. आता त्यांना राजकारणात रस आहे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, धुळे, नाशिक, सातरा भागात कांद्याचे प्रश्न आहेत. मोदी येतात मात्र शेतीच्या प्रश्नावर बोलत नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. मोदी फक्त राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका करतात.
मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं. त्यांनी कार्यक्रम घेतला तो गुजराती परिसर आहे. त्यांचं लक्ष फक्त एका वर्गाकडे होतं. लोकांना खूप त्रास झाल्याचे शरद पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.