Sharad Pawar News : संघटन बांधणीतही शरद पवारांचे लक्ष जिल्ह्याच्या कांद्याकडे; नाशिकमध्ये लवकरच बैठक

Sharad-Pawar on onion
Sharad-Pawar on onionesakal
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यावर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. मात्र, यातही शरद पवार यांचे लक्ष नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नाकडे आहे.

कांदा दर, बाजार समितीतील खरेदी, नाफेडची खरेदी, शेतकऱ्यांची भूमिका आदी परिस्थितीबाबत पवार दररोज माहिती घेत आहेत. जिल्ह्यातील पाऊस, दुष्काळ याबाबतही त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, अशा सूचना करीत लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार असून, या प्रश्नी बैठक घेणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar focus is on onion of district for in organization building nashik news)

जिल्ह्यात जेव्हा कांद्याचे भाव गडगडत होते, तेव्हा केंद्रात कृषिमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना शरद पवार यांना कांदा उत्पादक शेतकरी साकडे घालत होते. कृषिमंत्रिपदानंतरही अनेकदा कांद्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले जायचे. त्यामुळे श्री. पवार हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असल्यावर आवर्जून कांदा प्रश्नाबाबत विचारणा करीत कानोसा घेत असतात.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्याने कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध आले. पर्यायाने कांद्याचे भाव कमी होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापारी व शेतकऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, या प्रश्नी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको, कांदा रस्त्यावर फेकत आंदोलने केली. या प्रश्नी उद्रेक होऊ लागले असल्याचे लक्षात येताच केंद्राने ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदीची घोषणा केली.

त्यानंतरही शेतकऱ्यांनी कांदा बाजारात न आणण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कांदा प्रश्न चांगलाच पेटला होता. या सर्व परिस्थितीवर शरद पवार यांचे बारीक लक्ष होते. गत आठवड्यापासून पवार दररोज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून कांद्याची असलेली परिस्थिती जाणून घेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad-Pawar on onion
Sharad Pawar News: पहाटेच्या शपथविधीवेळी ठरलं होतं, आता अजित पवारांना पुन्हा संधी नाही; शरद पवार स्पष्टचं बोलले

कांद्याची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला की नाही, बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू आहे का, कांद्याला काय भाव मिळाला, ‘नाफेड’कडून खरेदी सुरू झाली का, किती केंद्रांवर खरेदी सुरू आहे अशी विचारणा श्री. पवार यांच्याकडून होत आहे. मंगळवारी (ता. २९) मुंबईत बैठकीसाठी दाखल झालेल्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी कांदा प्रश्नी एकूण आढावा घेतला.

तसेच, जिल्ह्यात किती पाऊस झाला, धरणांमधील साठा किती आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, पाऊस नसल्याने कांद्याची लागवड घटणार याबाबत सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

"गत आठवड्यापासून शरद पवार यांचा दररोज फोन येत असून, ते जिल्ह्यातील कांद्याची परिस्थिती जाणून घेत आहेत. कांद्याचे दर, शेतकऱ्यांची भूमिका, आंदोलन याची माहिती श्री. पवार घेत आहेत. बैठकीसाठी मुंबईतील पक्ष कार्यालयात गेलो असता, त्या वेळी त्यांनी कांदा, पाऊस, दुष्काळ यांची माहिती घेतली. तसेच, कांद्याप्रश्नी ते लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार असून, बैठक घेणार आहेत." - कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

Sharad-Pawar on onion
Sharad Pawar News: 40 वर्षात असं पहिल्यांदाच घडलंय! पवारांची कोल्हापूर सभा अन् हसन मुश्रीफ झाले भावुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()