Sharad Pawar: शरद पवारांचे देवळाली मतदारसंघाकडे लक्ष! दिल्लीतील आढावा बैठकीत उमेदवार शोधण्याच्या सूचना

NCP President MP Sharad Pawar along with District President Kondajimama Awad, City President Gajanan Shelar, former corporator Gokul Pingle, Dattatray Malode in New Delhi.
NCP President MP Sharad Pawar along with District President Kondajimama Awad, City President Gajanan Shelar, former corporator Gokul Pingle, Dattatray Malode in New Delhi.esakal
Updated on

Sharad Pawar : सुरवातीस खासदार शरद पवार यांचे समर्थक असल्याचे सांगून नंतर अजित पवार गटात सहभागी झालेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांना पर्यायी उमेदवार शोधण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्लीतील आढावा बैठकीत दिल्या.

त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यात देवळाली या मतदारसंघावर पवार यांचे विशेष लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Sharad Pawar focus on Deolali constituency Instructions for Finding Candidates at the Review Meeting in Delhi nashik political)

राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे स्वतःसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची शपथ घेत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्या मागे किती आमदारांची संख्या आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नाशिक जिल्ह्यात देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहिरे यांच्याबाबत संभ्रम होता. मात्र, नंतर त्या अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्या. या पार्श्वभूमीवर खासदार पवार यांनी दिल्लीत जिल्ह्यातील १४ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेताना देवळाली मतदारसंघाची चौकशी केली.

देवळाली विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती राहील, याबाबत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. आगामी निवडणुकीसाठी काय करता येईल, कोण-कोण या मतदारसंघातून तयारी करीत आहे, याबाबत विचारणा करताना चार इच्छुकांची नावेही त्यांनी मागून घेतली.

यावरून देवळाली विधानसभा मतदारसंघात खासदार पवार यांनी विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, दत्तात्रय माळोदे यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर श्री. पिंगळे यांनी माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NCP President MP Sharad Pawar along with District President Kondajimama Awad, City President Gajanan Shelar, former corporator Gokul Pingle, Dattatray Malode in New Delhi.
ECI Notice to Sharad Pawar: शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; अजितदादांच्या याचिकेची घेतली दखल

पुढील महिन्यात पवार नाशिकच्या मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड उफाळल्यावर खासदार पवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. मुंबई येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतल्यावर नाशिक केंद्रस्थानी ठेवत त्यांनी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मेळावा घेतला.

या वेळी येवलेकरांची माफीही त्यांनी मागितली. नाशिक शहरातून अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात गेले असले, तरी शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे, तो वर्ग अद्यापही श्री. पवार यांच्या मागे आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभारी आणण्याबरोबरच विधानसभेत अपेक्षित आकडा गाठण्यासाठी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान शरद पवार हे पुन्हा नाशिकला दौरा करणार आहेत. या वेळी पक्षात मोठे प्रवेक्ष होण्याची शक्यता असून, पुढे श्री. पवार हे जळगाव येथे जाणार असल्याची माहिती श्री. पिंगळे यांनी दिली.

NCP President MP Sharad Pawar along with District President Kondajimama Awad, City President Gajanan Shelar, former corporator Gokul Pingle, Dattatray Malode in New Delhi.
NCP Crisis: राष्ट्रवादी काकांची की पुतण्याची? केंद्रीय निवडणूक आयोगाची दोन्ही गटांना नोटीस; आता...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.