Sharad Pawar Group: स्वातंत्र्यदिनी शरद पवार गटाचे शक्तीप्रदर्शन! मूळ कार्यालयाच्या 100 मीटर अंतरावर ध्वजारोहण

NCP Sharad Pawar
NCP Sharad Pawaresakal
Updated on

Sharad Pawar Group : शहराच्या राजकीय घडामोडीचे प्रमुख केंद्र असलेल्या मुंबई नाका परिसरात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिल्याचे पाहायला मिळाले.

ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला, त्या कार्यालयाच्या शंभर मीटर अंतरावरच मोकळ्या जागेत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा केला.

अवघ्या दोन दिवसात स्वातंत्र्य दिनाची तयारी करून शरद पवार गटाने अजित पवार गटाशी दोन हात करण्याची तयारी केली आहे.

दोन्ही पक्षांचे कार्यालय अवघ्या शंभर ते २०० मीटर अंतरावर असल्यामुळे नेमक्या कुठल्या कार्यालयात जायचे, या संभ्रमात कार्यकर्ते पडले आहे. (Sharad Pawar groups show of strength on Independence Day Hoisting of flag at distance of 100 meters from base office nashik political)

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. त्याचे परिणाम स्थानिक पातळीवर दिसून आले. अगदी पक्षाचे कार्यालय कोणाचे यावरूनही मोठे वाद झाले.

नाशिकमध्येदेखील मुंबई नाक्यावरील पक्षाच्या आधुनिक तीन मजली कार्यालयावरून वाद झाला. राज्यभर हा वाद गाजला. पक्षाचे प्रमुख शरद पवार नाशिकमध्ये आल्यानंतरही हा वाद धुमसत राहिला.

कधीकाळी तीन मजली कार्यालयात अजित पवार यांचा फोटो लावण्याची तसदी न घेणारे कार्यालयदेखील अजित पवार गटाने ताब्यात घेतल्याने आश्चर्य मानले गेले. मात्र राजकारणात कोणी कायमस्वरूपी दुश्मन नसल्याचे दिसून आले.

अजित पवार घाटाने राष्ट्रवादीच्या तीन मजली कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर शरद पवार गटानेदेखील जशास तसे उत्तर देण्यास सुरवात केली आहे. त्याला निमित्त स्वातंत्र्यदिन ठरला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NCP Sharad Pawar
Nashik ZP News: पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही रद्द होईना मान्यता

शरद पवार गटाकडून शहरात कुठेही स्वातंत्र्यदिन साजरा करता आला असता, परंतु आव्हान देण्याच्या दृष्टीने ज्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ आली त्याच कार्यालयाच्या बाजूला शंभर ते २०० मीटर अंतरावर नवीन शरद पवार गटाची पक्ष कार्यालय स्थापन करून शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे मूळ गटाकडे अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

"निष्ठावंत शरद पवार समर्थकांकडून मुंबई नाका येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाचे जुने कार्यालय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडे असून पोलिसांच्या मदतीने मॅनेज पद्धतीने अजित पवार समर्थक येथे काम करत आहे."- गजानन शेलार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

"सदर कार्यालय हे तात्पुरते असून, लवकरच कायमस्वरूपी कार्यालय होणार आहे. निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लवकरच हक्काची जागा मिळेल."

- गोकूळ पिंगळे, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस.

NCP Sharad Pawar
Shivsena vs Congress: नाशिक लोकसभा आम्हीही लढणार; काँग्रेसच्या दाव्याला शिवसेनेचे जोरदार उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.