NCP Saroj Ahire : घोलप एके घोलप या समीकरणाला छेद देत, निवडून आलेल्या सरोज आहिरे या अजित पवार यांच्यासोबत भाजपच्या गोटात सहभागी झाल्या आहे. स्वतःला ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या मानसकन्या म्हणवून घेणाऱ्या सरोज ताईंनी मोक्याच्या वेळी ‘साहेब की दादा‘ यांच्यात निर्णय घेताना, सत्तेला महत्त्व देत, दादाला साथ दिली.
त्यामुळे भविष्यात ज्येष्ठ नेते शरद पवार हे जर अजित पवार गटाविरुद्ध निवडणूक प्रचारात उतरलेच तर सरोजताईंची मात्र चांगलीच पंचाईत होणार आहे. (sharad pawar starts campaining ajit pawar supporter mla saroj ahire will in troble nashik NCP political news)
महापालिका प्रभाग, भगूर नगरपालिका, दोन जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीसह कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि अनेक ग्रामपंचायतीमुळे देवळाली मतदारसंघात शेतकरी कष्टकरी, दलित, आदिवासी आणि अमराठी अशी बहुरंगी संमिश्र मतदार आहेत.
मात्र, राखीव मतदारसंघात सर्वसाधारण आणि शेतकरी मतदार कुणाकडे, या भोवती देवळालीचे राजकारण ठरते. पंचवीस ते तीस वर्षे माजी मंत्री बबन घोलप यांच्या कुटुंबावर प्रेम केलेल्या या मतदारसंघाने गेल्या वेळी मात्र घोलप एके घोलप हे समीकरण नाकारत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या सरोज आहिरे यांना आमदार बनविले.
पुढे सरोजताईंनी साहेबांवरील शेतकरी प्रेमाचा करिष्मा ओळखून स्वतःला साहेबांची मानसकन्या घोषित करीत लोकप्रियता टिकविण्याचा पुरेपुर प्रयत्नही केला.
अप्रूप दादांचे.
देवळालीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यात ‘पवार साहेब की अजितदादा’ या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने संभ्रम असताना मागील संपूर्ण पंचवार्षिक साहेबांची या कथित मानसकन्या म्हणवून घेणाऱ्या सरोजताईंनी ऐनवेळी मात्र साहेबांची साथ सोडीत थेट दादा सोबत जाण्याचा मार्ग निवडला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे भलेही देवळालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात असले तरी सरोजताई मात्र दादासोबत आहे. ताईच्या या निर्णयावर मतदारांच्या काय प्रतिसाद राहील हे प्रत्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे जेव्हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मैदानात उतरतील तेव्हाच चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रश्न फक्त चिन्हांचा...
देवळाली मतदारसंघात माजी आमदार योगेश घोलप, तहसीलदार राजश्री अहिरराव - गांगुर्डे, नव्या भारत राष्ट्र समिती माजी आमदार भिकचंद दोंदे यांच्या कन्या सुवर्णा दोंदे, भाजपकडून प्रीतम आढाव, तनुजा घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मण मंडाले आदींसह अर्धा डझनहून अधिक उमेदवार यापूर्वीच तयारीला लागले आहेत.
विशेष म्हणजे यातील बहुतांश इच्छुकांची उमेदवारी देईल तो पक्ष हीच भूमिका बघता, देवळालीत चिन्ह बदलेल पण उमेदवार मात्र तेच असेच चित्र राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.