Sharad Pawar : कामगारांचे ऐक्य हेच चळवळीच्या यशाचे सूत्र : शरद पवार

Former Union Agriculture Minister Sharad Pawar at the Amritmahotsav celebrations of Hind Mazdoor Sabha
Former Union Agriculture Minister Sharad Pawar at the Amritmahotsav celebrations of Hind Mazdoor Sabha esakal
Updated on

Sharad Pawar Nashik : बदलत्या आर्थिक धोरणानंतर कामगार चळवळ (Nashik News) संक्रमणावस्थेतून जात आहे हे खरे आहे. पण त्याचवेळी ७५ वर्षांहून अधिक काळ एखादी संघटना ऐक्याच्या जोरावर कसे काम करू शकते, हे आपण दाखवून देत आहात.

भविष्यात कामगारांना हेच ऐक्याचे सूत्र त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (sharad pawar statement about Unity of workers nashik news)

नाशिक रोडला हिंद मजदूर संघाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयाच्या यूएस जिमखाना मैदानावर झालेल्या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरभजनसिंग सिद्धू, प्रेस मजदूर संघाचे अध्यक्ष जयंत भोसले, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, हिंद मजदूर सभेचे राज्य पदाधिकारी संजय वडावकर आदी उपस्थित होते. मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे अध्यक्षस्थानी होते.

श्री. पवार म्हणाले, की मुंबई देशाची प्रमुख उद्यमनगरी होती, आता तिला ‘आर्थिक केंद्र’ म्हणतात. कधीकाळी सकाळपासूनच गिरणी कामगार झिजत होता. त्यांच्या चाळी, गिरण्या राहिलेल्या नाही. त्याजागी उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. जुन्या गिरण्या आणि चिमण्या नाहीत. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामुळे हे घडले आहे.

हिंद मजदूर सभेला प्रदीर्घ इतिहास आहे. कॉम्रेड डांगे, एस. आर. कुलकर्णी यांच्यापासून अनेकांनी नेतृत्व केले. संघटना मजबूत आहे म्हणून तुम्ही उभे आहात. आज धर्म आणि जातीत माणसामाणसांत भिंती उभ्या केल्या जात आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Former Union Agriculture Minister Sharad Pawar at the Amritmahotsav celebrations of Hind Mazdoor Sabha
Indutai Wagh : राज्यातील पहिली महिला कुली बनल्या प्रवाशांसाठी आधार

मूळ प्रश्नांना बगल देऊन जात-धर्माच्या नावाने राजकारण सुरू आहे. मात्र नाशिक रोडला आल्यावर लाल टोपी खाली तुमचे डोके शाबूत आहे, हे समाधानाचे चित्र आहे. आज वेगळ्या दिशेने समाज जात आहे ते रोखले पाहिजे. मी अनेक कारखाने पाहिले; पण इतके चांगले वातावरण पाहिले नाही. सुरक्षेची तुमची बांधिलकी आहे.

श्री. सिद्धू यांनी देशातील कामगार चळवळीपुढील आव्हानांचा आढावा मांडला. ते म्हणाले, की शरद पवार हे देशातील जनमानसात पत असलेले आश्वासक नेते आहेत. बदलत्या कामगार धोरणामुळे देशातील कामगार देशोधडीला लागला आहे. विनाचर्चा ४४ कामगार कायदे बदलले गेले. आधुनिकीकरणाला कामगारांचा विरोध नव्हता.

पण किमान वेतन हक्क आणि कामसुद्धा सरकार देणार नसेल, तर कामगार बोलणारच ना. कामगार सत्तेत बसवू शकतो. तसा सत्तेतून घालवू शकतो, याची शासनकर्त्यांना जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. आपण नेतृत्व करा, देशातील १५ कोटी कामगार आपल्या पाठीशी राहू, असा दावा त्यांनी केला. तत्पूर्वी जगदीश गोडसे यांनी प्रास्ताविक केले.

Former Union Agriculture Minister Sharad Pawar at the Amritmahotsav celebrations of Hind Mazdoor Sabha
NMC Water Reduction : मंगळवारी पाणीकपातबाबत अंतिम निर्णय

प्रेस कामगारांच्या ७५ वर्षांच्या वाटचालीची माहिती देत डिजिटल करन्सीमुळे कामगार चळवळ आणि अर्थव्यवस्थेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, त्याकडे लक्ष वेधले. श्री. भोसले, खासदार गोडसे, वडावकर यांची भाषणे झाली. ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी अध्यक्षीय भाषणात मजदूर संघ आणि हिंद मजदूर सभेच्या वाटचालीची माहिती दिली. राजेश टाकेकर यांनी सूत्रसंचालन केले.

प्रेसची आठवण कटू

श्री. भुजबळ यांनी प्रेसमध्ये नोकरी हे नाशिकमध्ये प्रतिष्ठेचे लक्षण आहे. पण माझी आठवण फार कटू आहे. माजी प्रबंधक गंगाप्रकाश यांचे नाव घेत त्यांच्या काळातील तेलगी मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणात कठोर चौकशी केली. मोका लावला.

पण त्यात माझ्यावर आरोप झाल्याने मंत्रिपद गमवावे लागल्याची आठवण सांगितली. या वेळी प्रेसमधील नोटा आणि पारपत्राच्या कामकाजाची श्री. पवार यांनी पाहणी केली. मजदूर संघातर्फे पवार यांना त्याच्या १२. १२. १९४० या जन्म तारखेच्या क्रमांकाच्या नोटांच्या प्रतिकृतीची अनोखी भेट दिली.

Former Union Agriculture Minister Sharad Pawar at the Amritmahotsav celebrations of Hind Mazdoor Sabha
Chandrasekhar Bawankule : सातपूर बसस्थानक महत्त्वाचे केंद्र ठरेल : चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.