सभासदांचा कल महत्‍वाचा : खासदार शरद पवार

Sharad Pawar latest marathi news
Sharad Pawar latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : राज्‍यातील प्रदीर्घ इतिहास असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थांपैकी मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था ‍आहे. संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर सभासदांचा कौल, समज-गैरसमजांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. उमेदवारीवरून निर्माण होणाऱ्या संभ्रमातून अत्‍यंत दुःखी झाल्‍याची खदखद त्‍यांनी मनोगतातून व्‍यक्‍त केली. (Sharad Pawar statement in MVP election nashik Latest Marathi News)

एमरॉल्ड पार्क येथे मविप्र संस्‍थेच्‍या इतिहासावर आधारित पुस्‍तक समारंभाप्रसंगी श्री. पवार बोलत होते. दरम्‍यान, मविप्र निवडणुकीत सरचिटणीस पदाच्‍या उमेदवारीसंदर्भातील वादाचे पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात श्री. पवार यांनीही भाष्य केले. प्रारंभीच्‍या भेटीत श्रीराम शेटे यांच्‍या नावाची शिफारस सरचिटणीस पदासाठी केली गेली. त्‍यानुसार त्‍यांना निवडणूक लढविण्यासाठी शब्‍द टाकला. परंतु, काही दिवसांआधीच्‍या भेटीत सभासदांकडून आपल्‍या उमेदवारीचा आग्रह धरल्‍याचे नीलिमाताई पवार यांनी सांगितले. सभासदांचा कल महत्त्वाचा असून, त्‍यालाच प्राधान्‍य द्यायला हवे. प्राधान्‍यक्रम डावलल्‍याने या प्रकरणातून मी अत्‍यंत दुःखी झालो आहे, अशा शब्‍दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या सूचनेनुसार रयत शिक्षण संस्‍थेच्‍या हितासाठी कामकाजात लक्ष दिले. शक्‍यतो मी शैक्षणिक संस्‍थांच्‍या कामकाजात लक्ष घालत नाही, असे सांगताना समज-गैरसमज दूर करत सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे, अशा शब्‍दात त्‍यांनी उपस्‍थित पदाधिकाऱ्यांना सूचक सल्‍ला दिला.

Remarks :

शहर-जिल्‍हा

Audit History:Date/Time Description ActionBy

7/29/2022 8:41:15 PM New Story Created marun

7/29/2022 8:41:29 PM Story moved to desk Nashikcity marun

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()