कळवण (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला होते. तेव्हा सत्ता हातात आल्यानंतर ती सामान्यांसाठी वापरायची असते. याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केला याचे स्मरण होते.
या देशात राजे-रजवाडे अनेक होऊन गेले पण आपण कधी मोघलांचे नाव ऐकले, कधी जयपूरचे नाव ऐकले तर कधी अन्य राज्यांचे नाव ऐकले. पण या सगळ्या राजांची राज्ये त्यांच्या नावाने केली होती.
एकच राज्य होते जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केले ते रयतेचे राज्य होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले. (Sharad Pawar statement on Unveiling of statue of chhatrapati shivaji maharaj at Kalavan Nashik News)
कळवण येथे कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी श्री. पवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज छत्रपती संभाजीराजे होते. व्यासपीठावर अनिल राम सुतार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादाजी भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, कीर्तनकार संजय धोंडगे, प्रा. यशवंत गोसावी, हेमंत टकले, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, विशाल नरवाडे, बंडू कापसे, संजय चव्हाण, विजयराज वाघ, रामचंद्र पाटील, देविदास पवार, धनंजय पवार, अशोक पवार, रावसाहेब शिंदे, कारभारी पगार उपस्थित होते.
कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांचा कळवण तालुक्यातील शिवप्रेमीच्या वतीने खासदार शरद पवार व युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सत्कार केला.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
पालकमंत्री दादा भुसे यांनी अर्थसंकल्पाची माहिती देऊन येणाऱ्या दहा दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सभागृहात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करण्यासाठी एकत्र राहू व देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.
आमदार नितीन पवार यांनी छत्रपती पुतळ्यापासून प्रेरणा घेऊन दळवट येथे माजीमंत्री एटी पवार यांचे स्मारक उभारण्याचे सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री छगनराव भुजबळ, प्रा. यशवंत गोसावी, कीर्तनकार संजय धोंडगे यांनी मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी केली. शिल्पकार अनिल राम सुतार यांनी पुतळ्याचे वैशिष्ट्य सांगितले.
प्रास्ताविक शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी तर राकेश हिरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवस्मारक समितीचे सर्व सदस्यांसह तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज : छत्रपती संभाजीराजे
३५० वर्षानंतरही शिवाजी महाराजांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. महाराजांचे आचार, विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. शासनाने कांद्याचा वांदा सोडविण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योग उभारण्याची विनंती करून शासनाने नाशिक जिल्ह्यातील पाच किल्ले माझ्याकडे द्यावी ती संवर्धन करण्याची ग्वाही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.