Sharad Pawar on Atul Save: राज्याचे मंत्री केंद्राच्या विसंगत धोरण मांडतात; पवारांचा सहकार मंत्री सावेंवर निशाणा

Sharad Pawar News
Sharad Pawar Newsesakal
Updated on

नाशिक : सहकारी संस्थांची नोंदणी करायची असेल तर जिल्छाध्याक्षांची परवानगी घ्या, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना काल लक्ष केल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (sharad Pawar target on cooperation minister atul Save Ministers of State present inconsistent policies of Centre maharashtra politics nashik news)

केद्र सरकारच्या विपरीत धोरण राज्याचे मंत्री मांडत आहेत. मंत्री सावेंचा हा मुद्दा केंद्राच्या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित केरू असे पवारांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना आज म्हटले. वीज परिषद आणि एड. नितीन ठाकरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्या निमित्त कालपासून श्री.पवार नाशिकमध्ये आले आहेत.

त्यांनी शनिवारी ता.११ पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. ते महाराष्ट्राला काही देत असतील तर आनंद आहे. पण येवून राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यानीच करावा. भाजपने त्यांच्या पक्षात काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sharad Pawar News
BJP News : मी जे बोललो त्यात चूक काय? सहकार मंत्री अतुल सावे यांचे दाव्याचे समर्थन

माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राउत हे जेलमध्ये होते. नवाब मलिक आजही जेलमध्ये आहेत. राज्य पातळीवर काम करणार्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भूमिकेचा विचार त्यांनी करावा, असेही पवार म्हणाले.

कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी वर्षभरापुर्वी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना सर्वाना विश्वासात घेतले नाही. एवढीच व्यथा आहे. पण आज हा विषय संपला आहे, अएहेही त्यांनी सांगितले.

तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते

अजित पवार हे मुख्यमत्री व्हावे ही अनेकांची इच्चा असली तरी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. पूर्ण बहुमत असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्श्वासात घेवोन निर्णय घेतला असता, असे पवारांनी म्हटले.

Sharad Pawar News
Girish Mahajan | राज्यात लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होईल : गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.