Sharad Pawar: पवारांच्या खेळीने सगळेच अवाक, ठाकरेंच्याच नेत्याला घेतल आपल्या पक्षात

UBT Shivsena & SP NCP Political Updates in Marathi: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकूळ झिरवाळ उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
Maharashtra Political Updates
Maharashtra Political Updatesesakal
Updated on

Latest Maharashtra Political News: दिंडोरी- पेठ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रेचे उद्या मंगळवार (ता.२४) दिंडोरी येथे आगमन होत असून यात्रेच्या स्वागतासाठी मतदार संघातील इच्छुकांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु केली आहे.

उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेस बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दिंडोरी येथे शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख आदींच्या उपस्थितीत संस्कृती लॉन्स येथे सकाळी दहाला यात्रेचे सभेत रुपांतर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.