Shasan Aplya Dari: लाभार्थी बससाठी ताटकळले! रोजगाराच्या स्टॉलवर तोबा गर्दी

Beneficiaries waited for msrtc citylinc bus
Beneficiaries waited for msrtc citylinc busesakal
Updated on

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला डोंगरे वस्तीगृह मैदानावर सुरूवात झालेली असतानाच, काही नागरिकांनी मैदानातील चिखलामुळे गंगापूर रोडवरील दुभाजकांवर ठाण मांडून बसच्या प्रतिक्षेत बसून होते.

तर, तरुणांसाठी रोजगारांच्या स्टॉलही उभारण्यात आल्याने प्रत्येक स्टॉलवर तरुणाईने तोबा गर्दी केली होती. दरम्यान, मुलभूत सेवासुविधांअभावी विशेषत: महिलांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. (Shasan Aplya Dari Beneficiaries waited for msrtc citylinc bus employment stalls crowded nashik)

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. अधूनमधून बसरणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मैदानावर चिखलाचे साम्राज्य होते. तर मंडपातही ठिकठिकाणी पाणी साचले होते.

सकाळपासूनच सभामंडपात जिल्हाभरातून लाभार्थी आले होते. मात्र, कार्यक्रमाला तब्बल दोन तास विलंब झाल्याने ताटकळत बसलेल्यांनी मंडपातून काढता पाय घेतला. परंतु मंडपाबाहेरही पावसामुळे झालेल्या चिखलाने अनेकांनी गंगापूर रोडवरील दुभाजकांवरच ठाण मांडले.

कार्यक्रमस्थळी परिवहन महामंडळाच्या बसेस व सीटीलिंकच्या बसेसने लाभार्थर्यांना थेट कार्यक्रमस्थळी पोहोच केलेले होते.

परत जाताना या लाभार्थ्यांना सिटीलिंक बसेसने इदगाह मैदानावर सोडले जाणार होते. त्यामुळे बसच्या प्रतिक्षेत शेकडो महिला-पुरुष थांबलेले होते. तर काही लाभार्थ्यांनी पायीच इदगाह मैदानाचा रस्ता धरल्याचे दिसून आले.

तर, मैदानावर शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आलेले होते. याठिकाणी योजनांची माहिती दिली जात होती. परंतु त्याकडे फारसे कोणी फिरकत नव्हते. परंतु, एका बाजुला रोजगारांसंदर्भातील विविध कंपन्यांचे ४० स्टॉल लावण्यात आलेले होते.

या स्टॉलवर मात्र युवक-युवतींची लक्षणीय गर्दी होती. याठिकाणी युवक-युवती स्टॉलवर जाऊन संबंधित कंपनीकडे आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज देत होते. त्याचप्रमाणे, आरोग्य विभागाच्या स्टॉलवर ग्रामीण भागातून आलेल्यांची शुगर, रक्तदाबाची तपासणी केली जात होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beneficiaries waited for msrtc citylinc bus
Sakal Survey : 'एकला चलो रे' म्हणणाऱ्या राज ठाकरेंची जादू 2024मध्ये तरी चालणार का?

सेल्फी पॉईंट, पण सुविधांसा अभाव

डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर सेल्फी पॉईंट उभारण्यात आलेले होते. कार्यक्रमांसाठी आलेले लाभार्थींसाठी हे सेल्फी पॉईंट होते. परंतु लाभार्थ्यांपेक्षा शासकीय कर्मचारीच या सेल्फी पॉईटवर आपले फोटो काढताना दिसत होते.

मात्र मैदानावर सुलभ शौचालये नसल्याने आलेले नागरिक स्टॉलच्या आडोशाला जात होते. मात्र महिलांची गैरसोय झाली होती. फिरते सुलभ शौचालये हे गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाच्या बाजुने रस्त्यालगत लावण्यात आलेले होते.

त्यामुळे सभामंडपातून थेट बाहेर जाणे आलेल्यांसाठी चांगलेच गैरसोयीचे होते. त्याचप्रमाणे, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था गैरसोयीची करण्यात आलेली होती.

Beneficiaries waited for msrtc citylinc bus
Sakal Survey : गाजावाजा करत महाराष्ट्रात एंट्री! BRS खरंच चमत्कार करणार? सर्व्हेत जनता म्हणते...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.