Nashik News: निफाडला शासन आपल्या दारी मोहीम! विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींना दाखल्यांचे वाटप

MLA Dilip Bankar, Neighbor Mayor Ratnamala Kapse, District Magistrate Hemangi Patil, Balasaheb Kshirsagar while distributing files under their door.
MLA Dilip Bankar, Neighbor Mayor Ratnamala Kapse, District Magistrate Hemangi Patil, Balasaheb Kshirsagar while distributing files under their door.esakal
Updated on

Nashik News : शासन आपल्या दारी हा शासनाचा अभिनव उपक्रम निफाड महसूल मंडळांतर्गत राबविण्यात येत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात सर्व शासकीय विभागामार्फत दिले जाणारे उत्पन्न दाखले, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड व निवडणूक संबंधी फॉर्म तसेच निराधार पेन्शन संबंधी लाभार्थी निवड,

त्यांची प्रमाणपत्रे यांचे वितरण करण्यात येऊन शासनाच्या लोकोपयोगी योजनांच्या लाभार्थींची निवड करण्यात आली. (shasan aplya dari campaign Distribution of certificates to beneficiaries of various government schemes Nashik News)

आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून लोकांना विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाहीत. ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार बनकरांनी केले.

या प्रसंगी रसलपूर येथील ७० लोकांना रेशनकार्ड, दिव्यांग बांधवांना व नागरिकांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी हेमांगी पाटील यावेळी उपस्थित होत्या.

कुटुंबात जन्माला येणाऱ्या पहिल्या अपत्याची काळजी घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे बाळाच्या माता पित्याला बेबी केअर किट देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाकडून हाती घेण्यात आलेला आहे. या बेबी केअर कीटचे लोकार्पण देखील करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Dilip Bankar, Neighbor Mayor Ratnamala Kapse, District Magistrate Hemangi Patil, Balasaheb Kshirsagar while distributing files under their door.
Namami Goda Project : नमामि गोदा प्रकल्पाचा D. P. R लांबणीवर

तहसीलदार शरद घोरपडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश सांगितले. मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे यांनी स्वागत केले. तलाठी शंकर खडांगळे यांनी सूत्रसंचालन केले. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक राजेंद्र डोखळे, राजेंद्र बोरगुडे, नगराध्यक्षा सौ रत्नमाला ताई कापसे,

उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, नगरसेवक सागर कुंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल चौधरी, वीज मंडळाचे सहाय्यक उपअभियंता कुशारे, एकात्मिक बाल विकासच्या प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे, सुलक्षणा ठोंबरे आदी उपस्थित होते.

MLA Dilip Bankar, Neighbor Mayor Ratnamala Kapse, District Magistrate Hemangi Patil, Balasaheb Kshirsagar while distributing files under their door.
Kharif Season Preparation: यंदा तृणधान्यासह मका, सोयाबीनचा पीक पॅटर्न! पावसावर ठरणार पिकांचे क्षेत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.