Employment fair : ‘शासन आपल्‍या दारी’अंतर्गत शनिवारी रोजगार मेळावा; सहभागासाठी या संकेतस्थळावर करा नोंदणी

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari esakal
Updated on

Employment fair : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत शासन आपल्‍या दारी उपक्रम राबविला जाणार आहे. (shasan aplya dari employment fair nashik news)

याअंतर्गत शनिवारी (ता.८) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला असून, यावेळी पाच हजाराहून अधिक रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध केल्‍या जाणार आहेत.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्‍यातर्फे रोजगार मेळाव्‍याचे आयोजन केले आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/3XCprtR या लिंकवर नोंदणी करावी.

Shasan Aplya Dari
Employment News: दुप्पट पगार देण्यास कंपन्या तयार, पण कर्मचारी मिळेनात, 'या' क्षेत्रात 51% पदे रिक्त

या संधीचा अधिकाधिक बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागातर्फे केले आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.

व भरती इच्छुक नियोक्ते यांनी रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसूचित करावी, असे आवाहनदेखील केले आहे.

Shasan Aplya Dari
Employment : राज्यातील तब्बल ८८,१०८ उमेदवारांना जानेवारी ते मे अखेरपर्यंत मिळाला रोजगार - मंगल प्रभात लोढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.