Shasan Aplya Dari : जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्त ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला होता. (shasan aplya dari Preliminary selection of 2 thousand 400 candidates in employment fair nashik news)
या अंतर्गत दोन हजार ४०० उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केलेली आहे.
कार्यक्रमस्थळी डोंगरे वसतिगृह मैदानावर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मेळावा घेण्यात आला. मेळाव्यासाठी नऊ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सुमारे ४८ कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होताना नोकरीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची तांत्रिक चाचणी व मुलाखती घेतल्या.
यातून दोन हजार ४०० उमेदवारांची प्राथमिक निवड कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली असून, यापैकी १८७ उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. दरम्यान, तब्बल चार हजार ५०१ जागा रिक्तच राहिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.