Nashik News: ‘शासन आपल्या दारी, की आपण शासनाच्या दारी’! कार्यक्रम खैरेवाडीत अन्‌ घेतला चिंचले गावात

Officials speaking in the government's Dari program
Officials speaking in the government's Dari programesakal
Updated on

Nashik News : मागील महिन्यात तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या खैरेवाडी येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा गाजावाजा करत भर पावसात स्वतः भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती.

त्यानंतर येथील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, आरोग्य सुविधा मिळाव्यात, विविध दाखले मिळावेत, यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम खैरेवाडीत घेण्यास आपल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (shasan aplya dari program organised at Khairewadi held at Chinchle village Nashik News)

त्याच अनुषंगाने तहसीलदार यांनी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम खैरेवाडी येथे आयोजित केला.

तसा निरोपही त्यांनी तलाठ्यांमार्फत ग्रामस्थांना दिला. मंगळवारी (ता. ११) कार्यक्रम होणार, अधिकारी येणार, म्हणून सर्व ग्रामस्थ घरीच थांबले व अधिकाऱ्यांची वाट पाहू लागले. मात्र, अधिकारी खैरेवाडीला गेलेच नाही.

तर या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली करत डोंगराळ भागात जाणे टाळत आपल्या सोयीनुसार मुख्य रस्त्यावर असलेल्या चिंचले येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सुरू केला. अचानक झालेल्या ठिकाण बदलामुळे अतिदुर्गम भागातील खैरेवाडी येथील ग्रामस्थांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला व कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials speaking in the government's Dari program
Nashik News : अमेरिकेत महिलांनी धरला फेर, झिम्मा अन् खेळांचा रंगतदार दंगा

यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका पुन्हा एकदा अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना बसला असून, परत एकदा ते राज्य शासनाच्या योजना व मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार असल्याचे चित्र समोर आले आहे.

ऐन वेळेवर कार्यक्रमाचे ठिकाण बदलल्यामुळे या वाडीतील व परिसरातील ग्रामस्थांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागले, म्हणून शासन आपल्या दारी की आपण शासनाच्या दारी, अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

यामुळे संतापाचे वातावरण पसरले आहे. आता प्रशासन मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करते, याकडे या दुर्गम भागातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Officials speaking in the government's Dari program
Nashik Kalaram Temple : काळाराम मंदिरात भाविकांनी अनुभवला किरणोत्सव; गाभाऱ्यातील मूर्तींना सूर्यस्नान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.