Shasan Aplya Dari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १५ जुलै रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून सर्व विभागांमधील योजनांचा लाभ नागरिकांना झाला त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी १० व ११ जुलै रोजी शासन आपल्या दारी ही विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. (shasan aplya dari ZP officials reached 2 lakh beneficiaries nashik News)
त्यासाठी मुख्यालयासह गटविकास अधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायतींचे अधिकारी यांनी फिल्डवर उतरविले. दोन दिवस राबविलेल्या या विशेष मोहिमेंतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ३१६ लाभार्थ्यांपर्यंत पोचवून त्यांना शासनाकडून दिलेल्या विविध योजनांचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेमधील सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी दोन दिवस ही विशेष मोहीम राबविली गेली. यात सोमवारी योजना व लाभार्थ्यांची माहिती गोळा केली गेली. तर, मंगळवारी (ता.११) प्रत्यक्ष नेमणूक केलेले संपर्क अधिकारी सर्व तालुक्यांना व ग्रामपंचायतींना भेटी दिल्या.
यात अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे (नाशिक), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे (त्र्यंबकेश्वर), सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार (इगतपुरी),शिक्षणाधिकारी भगवान फुलारी (पेठ), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते (सुरगाणा), कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे (दिंडोरी), कार्यकारी अभियंता पंकज मेतकर (कळवण), जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील (बागलाण), जिल्हा मोहीम अधिकारी कृषी (देवळा),
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील (चांदवड), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे (मालेगाव), कृषी अधिकारी मयूरी झोरे (नांदगाव), माध्यमिक शिक्षण अधिक्षक सुधीर पगार (येवला), कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे (निफाड), उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (सिन्नर) या संपर्क अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर देय असणाऱ्या सर्व वैयक्तीक लाभाच्या विकास योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत त्यांना शासकीय योजनांच्या प्रमाणपत्राचे वाटप केले.
तसेच शासकीय योजना लाभ मिळण्याबाबतचे निवेदन भरून घेतले. लाभार्थ्यांशी संवाद साधून त्याचा फोटो, व्हिडिओ शूटिंग देखील काढले.
तालुकानिहाय लाभार्थी प्रमाणपत्रांचे झालेले वाटप
सुरगाणा (१९ हजार ७६९), पेठ (३८ हजार ३०२), इगतपुरी (३९ हजार ४८६), बागलाण (१५ हजार ४), मालेगाव (२६ हजार ६००), दिंडोरी (१८ हजार १४४), त्र्यंबकेश्वर (१६ हजार ७४), कळवण (१० हजार ५४६), चांदवड (६ हजार ९५), नाशिक (७ हजार ६०७), नांदगाव (४ हजार ९२५), सिन्नर (३ हजार १३५), देवळा (५ हजार ६००), निफाड (४ हजार ६३६), येवला (१ हजार ९९३).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.