Malegaon News : हिंगणवाडी येथे गारठ्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू

sheep
sheepeasakal
Updated on

नांदगाव (ग्रामीण) : तालुक्यात सतत सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच गारव्याचा फटका पिकांसोबतच पशुधनालाही बसला आहे. तालुक्यातील हिंगणवाडी येथील गंगा मदने यांच्या १५ मेढ्या व १ शेळी दगावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नांदगाव तालुक्यात मोठ्या संख्येने मेंढीपालन व्यवसाय केला जातो. मेंढ्यांना छत नसलेल्या बंदिस्त जागी ठेवण्याची पद्धत आहे. मेंढपाळ चराईसाठी मेंढ्यांचे कळप घेऊन भर पावसाळ्यात भटकंती करत असतात. मेंढ्यांना अधिक पाऊस मानवणारा नसतो. परंतु, या भागात अचानक झालेला पाऊस मेंढ्यांच्या जीवावर बेतणारा ठरला आहे. (sheep died in hinganwadi due to chill malegaon news)

sheep
Fire Accident News : नामपूरला अंगणवाडीत गॅसने घेतला पेट

तालुक्यात बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मात्र पावसाचा सतत होणारा मारा हा मेंढ्यांना गारठवून मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस आणि सोबतच गारठा आहे. त्याचा फटका मेंढ्यांना बसला. पाऊस आणि गारठा सहन न झालेल्या मेंढ्यांचा तालुक्यात ठिकठिकाणी मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पावसाची संततधार आणि उन्हाचा अभाव यामुळे भिजल्याने अनेक मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. भटकंती करणाऱ्या या घटकाच्या समस्येकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. पशूसंवर्धन विभागाने पंचनामे करून भरपाई मिळावी, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मेंढपाळांकडून केली जात आहे.

sheep
Nashik : प्लास्टिक जप्त करत 30 हजाराची दंड वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.