नाशिक : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. याच अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार सोडण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केले आहे.
यात स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची सायबरला तर, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडे स्थानिक गुन्हेशाखेचा पदभार देण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण दलात ६ पोलिस निरीक्षक, ७ सहायक निरीक्षक व ५ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Shift of shoulders in Nashik rural police officers Superintendent shahaji Umap made changes before transfer news)
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी (ता.३१) ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती केली, तर राजू सुर्वे यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी दिली आहे.
नियंत्रण कक्षातील सुनील भाबड, दत्ता चौधरी यांची जिल्हा वाहतूक शाखेत, नव्याने हजर झालेले अरुण धनवडे यांची ओझर पोलिस ठाण्यात, नव्याने हजर झालेले सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे यांची नांदगाव पोलिस ठाणे, दिलीप राठोड यांची सिन्नर, राकेशसिंह परदेशी यांची दिंडोरी पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.
मालेगाव कॅम्पचे दिलीप खेडकर यांची नाशिक तालुका पोलिस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील दत्तात्रय लांडगे यांची मनमाड पोलिस ठाण्यात, चांदवडचे रवींद्र जाधव यांची मालेगाव कॅम्पला व नियंत्रण कक्षातील श्रद्धा गंधास यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ यांची लासलगावला, लासलगावचे अशोक मोकळ यांची नियंत्रण कक्षात, विजय सोनवणे यांची निफाड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वाचक म्हणून नेमणूक झाली आहे.
नव्याने हजर झालेले हनुमान उगले यांची सिन्नरला, नांदगाव पोलिस ठाण्यातील कल्याणी पाटील यांची नियंत्रण कक्षात नेमणूक झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.