Nashik Political News: बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे जोरदार जल्लोष ढोलताशे, फटाके वाजवून आनंद व्यक्त
नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षासह चिन्हाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यानंतर बाळासाहेबांचे शिवसेनेतर्फे पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयासमोर ढोल ताशे व फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
मागील वर्षाच्या जून महिन्यापासून राज्यांमध्ये सत्ता संघर्ष चालू आहे. सत्तासंघर्ष बरोबरच अनेक वर्षांपासून मराठी माणसाच्या मनात घर केलेल्या शिवसेना पक्ष कोणाचा यावरूनदेखील वाद सुरू आहे. (shinde Balasaheb Shiv Sena expressed happiness by dhol firecrackers after shiv sena symbol distribution Nashik Political News)
केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात हा वाद पोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१ व २२ फेब्रुवारीला पाच सदस्यांच्या खंडपीठांसमोर निकाल देण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभराचे लक्ष या निकालाकडे लागले असतानाच शुक्रवारी (ता. १७) संध्याकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना व चीन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच असल्याचा निकाल दिला.
बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच धनुष्यबाण व शिवसेना नाव मिळाल्याने नाशिकमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर गर्दी झाली. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला, तर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
"‘सत्य परेशान हो सकता है पराजित नाही’, याची प्रचिती आज आले. शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचा वारसा चालविणाऱ्या एकनाथ शिंदे यांचेच आहे असा दावा आमचा यापूर्वी होता व आज निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. या विश्वासातूनच आज सकारात्मक निर्णय मिळाला. यापुढे आम्ही भगव्याशी व शिवसेनेची प्रामाणिक राहू." - अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना.
"शिवसेना बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापन झाली. त्यानंतर अनेक निवडणुका त्यांनी धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या आणि जिंकले सुद्धा. त्यांच्या निधनानंतर आदरणीय उद्धव साहेबांनी धनुष्यबाण चिन्हावर अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय हा ठाकरे परिवाराच्या अधिकाराचा हनन करणारा, लोकशाहीला घातक आहे. दिलेला निर्णय दबावाखाली दिलेला दिसत आहे. शिवसेना यापुढे अधिक जोमाने काम करेल. शिवसैनिक हा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांसाठी लढण्यासाठी सज्ज राहील."
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, उभाठा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.