Nashik MD Drug Case: भूषण, अभिषेकच्या पोलिस कोठडीत वाढ; पथके नाशिकमध्ये तळ ठोकून

MD drugs crime
MD drugs crimeesakal
Updated on

Nashik MD Drug Case : शिंदेगावातील एमडी ड्रग्जचा कारखाना मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी उद्‌ध्वस्त केल्यानंतर, आणखी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसात गेल्या ऑगस्ट महिन्यात गुन्हा दाखल असून, रॅकेटचा शोध घेत ते शिंदेगावापर्यंत पोहाेचले होते.

कारखाना उद्‌ध्वस्त केल्यानंतर साकीनाका पोलिसात शहरात तळ ठोकून असतानाच, एकाला अटक केली. तर दुसर्याला दिल्लीतून अटक केली आहे.

दरम्यान याप्रकरणी भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडे यांना पुणे न्यायालयात हजर केले असता, त्यांना २० तारखेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. (shinde gaon MD Drug Case Bhushan Abhishek in police custody extended teams camped in Nashik crime)

शिवाजी शिंदे (४०, रा. नाशिक), रोहितकुमार चौधरी (३१, रा. वसई) अशी साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात मुंबई पोलिसांनी कारवाई करीत, एका संशयिताकडून १० ग्रॅम एमडी जप्तीची कारवाई केली होती.

तेव्हापासून मुंबई पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत होती. अखेर साकीनाका पोलिसांनी गेल्या ५ तारखेला नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे गावातील एका गोदामात धाड टाकत तब्बल १३३ किलो एमडी आणि रसायन असा ३०० कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता.

तसेच, संशयित जिशान इक्बाल शेख (३४, रा. नाशिकरोड) यास अटक केली होती. या कारवाईनंतरही नाशिकमध्ये तळ ठोकून असलेल्या साकीनाका पोलिसांनी नाशिक परिसरातून शिवाजी शिंदे यास शिताफीने अटक केली आहे.

शिंदेच जिशान यास मालाचा पुरवठा करीत असल्याचे तपासातून समोर आलेले आहे. पोलीस तपासामध्ये संशयित जिशान याने पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

MD drugs crime
Nashik MD Drug Case: भूषणला घेऊन पुणे पोलिस नाशिकमध्ये; ससून ड्रग्ज प्रकरणाचा तपासी अधिकारीही बदलला

साथीदार रोहितकुमार चौधरी यास साकीनाका पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. दोघांच्या चौकशीतून एमडी ड्रग्जच्या रॅकेटची उकल होण्यास मदत होणार आहेे.

भूषण, अभिषेकच्या कोठडीत वाढ

शिंदे गावातील कारखाना हा एमडी ड्रग्जचा माफिया व ससून रुग्णालयात पसार झालेल्या ललितचा भाऊ भूषण पानपाटील हाच चालवत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

भूषण व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बाराबंकीतून अटक केली आहे. त्याचा कसून तपास सुरू असून, रविवारी (ता.१५) भूषणला तपासाकामी नाशिकला आणण्यात आले होते.

उपनगर परिसरातील त्याच्या राहत्या घरी त्यास आणून चौकशी करण्यात आली असता, घरातून आणखी आठ पेनड्राईव्ह जप्त करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच, आणखी सहा संशयित याप्रकरणी निष्पन्न झाल्याचीही माहिती दिली आहे

MD drugs crime
दया नायक यांच्या पथकाची मोठी कारवाई! १६ कोटींचे घातक ‘MD’ ड्रग्ज मुंबईत पकडले; सोलापुरातील दोघांना पोलिस कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()