Shivsena News : अयोध्येत शिंदे सेनेचे ‘जय श्रीराम’ पथक रवाना; नियोजनाची जबाबदारी पुन्हा नाशिकवर

(Shiv Sena)
(Shiv Sena)esakal
Updated on

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून दोनदा अयोध्या दौऱ्याचे नियोजन यशस्वी झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ९ एप्रिलला होणाऱ्या रामलल्ला दर्शनाची जबाबदारीदेखील नाशिकवर येऊन पडली असून, त्यासाठी पथक रवाना झाले आहे. नाशिक मधून यंदाही स्वतंत्र रेल्वे करण्यात आली आहे.

त्याद्वारे १३००, तर नाशिकमधून एकूण ३ हजार कार्यकर्ते महाआरतीत सहभागी होणार आहे. (Shinde Sena Jai Shriram in Ayodhya squad Depart Planning responsibility again on Nashik news)

शिवसेना एकसंध असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे या ठाकरे कुटुंबीयांनी अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले. प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडे जबाबदारी होती. खासदार राऊत यांनी अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी त्या वेळच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविली होती.

वाहनांचे नियोजन करणे, पदाधिकारी- कार्यकर्ते जमविणे, भोजन व्यवस्था, रामलल्ला दर्शन तसेच शरयू नदी आरती सहभाग याचे काटेकोर नियोजन पदाधिकाऱ्यांनी केले होते. आठ दिवस अयोध्येत ठाण मांडून बसले होते. त्यानंतर सलग दुसरा अयोध्या दौरा निश्चित करण्यात आला.

त्या वेळीदेखील मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवरच जबाबदारी सोपविण्यात आली होती. तो दौरादेखील यशस्वी पार पडला. त्यानंतरच्या काळात राज्यात सत्तांतर घडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकारण तापले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

(Shiv Sena)
Nashik News : खरीप हंगामासाठी बळिराजा सज्ज

भाजपकडून सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका मांडली. मनसेचे इंजिनही हिंदुत्वाच्या मार्गावर चालले आहे. आता सत्तेत सहभागी शिंदे गटदेखील हिंदुत्वाच्या भूमिकेवर आक्रमक झाला असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘अयोध्या मे शंखनाद, आ रहे है एकनाथ’ या बॅनरखाली अयोध्या दौऱ्याचा प्रचार सुरू केला आहे.

९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दर्शन घेतील. त्यासंदर्भातील सर्व जबाबदारी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, सुनील पाटील, ॲड. अभय महादास अयोध्या दौऱ्याचे नियोजन करत आहे.

"अयोध्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी आमच्यावर आली, हे आमचे भाग्य समजतो. यंदाचा अयोध्या दौरा पूर्वीपेक्षा अधिक जोमाने, ताकदीने पार पडतं आहे. त्याला कारण म्हणजे मुख्यमंत्री स्वतः अयोध्या आरतीचे नेतृत्व करतं आहे."

- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

(Shiv Sena)
MUHS Election Results : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थगित निवडणूकीचा निकाल जाहिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()