येवला (जि. नाशिक) : गल्लोगल्ली दुतर्फा फडकणारे भगवे ध्वज..., जिजाऊ-शिवरायांच्या वेशभूषेत अश्वारूढ झालेले युवक, तर रथावर विराजमान असलेली शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक.., चौकाचौकांत सादर झालेले लाठ्या-काठ्यांचे खेळ...
शिवरायांचे गुणगान सांगून जाणारी गीते, ‘शिवाजी महाराज की जय’चा घोष अन् सर्वपक्षीयांचा सहभाग..अशा उत्स्फुर्त वातवरणात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथे मिरवणूक काढण्यात आली. (Shiv Jayanti 2023 Chhatrapati Shivray honored with grand procession Stick twirling games at yeola nashik news)
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येथे स्वातंत्रपूर्व काळापासून सुरू असलेल्या ८८ व्या वर्षांचा इतिहास व परंपरा असलेल्या शिवजयंती जन्मोत्सवाची शिवजयंती उत्सव समितीने काढलेली मिरवणूक नेत्रदीपक ठरली.
प्रारंभी पाटोळे गल्लीतून शिवछत्रपतीच्या पुतळ्याला उत्सव समितीप्रमुख सुभाष पाटोळे, केशवराव पाटोळे, युवराज पाटोळे यांनी हार अर्पण केला. प्रमुख पाहुण्यांनी श्रीफळ वाढवून जयंतीनिमित्त १००१ लाडूचे वाटप करून मिरवणुकीला सुरवात झाली.
प्रारंभी स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थीनींच्या सहभागाचे लेझीम पथक, भगवे ध्वजधारी युवक, पाठोपाठ उत्स्फूर्त शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. अश्वावर आरूढ असलेल्या शिवछत्रपतीच्या वेशभूषेत गणेश सोमासे, तर जिजाऊच्या वेशात सोनाली शिंदे आणि बालशिवाजीच्या वेशात स्वराज पाटोळे यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले.
मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी विविध गणेश मंडळांनी शिवपूजन केल. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, युवानेते संभाजीराजे पवार, उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे,
भुजबळांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,भोलानाथ लोणारी, माजी उपनगराध्यक्ष सूरज पटणी, मर्चंट बँकेचे अध्यक्ष बालूशेठ परदेशी, भागवतराव सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, समीर देशमुख, गणेश शिंदे, गंगाधर पवार, आनंद शिंदे, राजू परदेशी आदींनी पूजन केले.
‘जय भवानी-जय शिवाजी’च्या जयघोषात भगवे ध्वज फडकवत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ठिकठिकाणी दाखवलेले मर्दानी कसरतींचे प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
मिरवणुकीदरम्यान महाराणा प्रताप, देवीखुंटावरील तुळजाभवानीला हार घालण्यात आला. ऐतिहासिक टिळक मैदानातील शिवरायांच्या पुतळ्यास हार घालून मिरवणुकीची सांगता झाली. गटनेते प्रवीण बनकर, डॉ. संकेत शिंदे, सचिन पाटील, वसंतराव पवार, समीर समदडिया, विजय श्रीश्रीमाळ, किशोर सोनवणे, अनिल हलवाई, आबासाहेब शिंदे,
राजेंद्र परदेशी, नाना लहरे, मनोज दिवटे, समीर देशमुख, पुरुषोत्तम रहाणे, डॉ.गोविंदराव भोरकडे, अरुण थोरात, गणेश शिंदे, प्रवीण निकम, राजूसिंग परदेशी, दत्ता नागडेकर, रामदास भड, दीपक पटोदकर, गोटू मांजरे, माधवराव पवार,
सचिन सोनवणे, साहेबराव सैद, प्रवीण पहिलवान, उत्तम घुले, अनिल हलवाई, शेरू मोमीन, बंडू क्षीरसागर, भाऊसाहेब कापसे, अशोक गायकवाड, सुधाकर पाटोळे, शंभूराजे शिंदे, किरण परदेशी, मयूर कायस्थ, पंडित पवार, अण्णा पवार, संतोष नागपुरे, बंटी धसे आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी प्रात्यक्षिक
फुलांनी सजवलेल्या अश्वारथावर शिवरायांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी युवकांनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिके दाखवली.
अग्रभागी भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजर, अश्वावर स्वार छत्रपतींच्या वेशभूषेतील युवक, दोन मावळे यांच्या मिरवणुकीत उपस्थित युवकांनी मिरवणुकीचे आकर्षण वाढविले. शिवप्रेमी नागरिकांनी मिरवणूक मार्गात ठीकठिकाणी उत्सव समिती सदस्यांचा सत्कार केला. कार्यक्रम व मिरवणूक संचलन दत्ता महाले यांनी केले.
*मुस्लिम बांधवांकडून सत्कार
धडपड मंचाच्या वतीने सांस्कृतिकार प्रभाकर झळके यांनी जब्रेश्वर खुंटावर शिवरायांच्या जीवनावर चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे देवी खुंटावर मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने उत्सव समिती सदस्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आगळावेगळा सामाजिक सलोखा दाखविला.
दादाभाई फिटर शेख, अकबर शेख, अन्सार शेख, निसार शेख, अमजद शेख, बशीर पठाण, मुस्ताक शेख, सलीम काजी आदींनी सत्कार केला. मिरवणुकीत मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.