नाशिक शहरभर सामना अग्रलेखाचे बॅनर; शिवसेना-राणे वाद पेटणार

shiv sena ajay boraste has put up banners of article in samana criticizing narayan rane in nashik
shiv sena ajay boraste has put up banners of article in samana criticizing narayan rane in nashik Sakal
Updated on

सिडको (नाशिक) : नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमध्ये जोरदार प्रतिक्रीया व्यक्त झाला. नाशिकमध्ये आक्रमक भूमिका घेत नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर (ता.२४) दगडफेक केली होती. आता आज दिनांक 25 रोजी सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला पान क्रमांक चार वरील अग्रलेखाचे माजी महानगरप्रमुख शिवसेना अजय बोरस्ते यांनी नाशिक शहरात बॅनर लावले आहेत. यामुळे पुन्हा शिवसेना-राणे यांच्याच पोस्टर वॉर पेटण्याची चिन्हे आहेत.

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मंगळवारी शिवसेनेने शहरात तीव्र आंदोलन केल्यानंतरही वातावरण अजूनही शांत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दैनिक सामना मध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांचा खरपूस समाचार घेत लिहिण्यात आला आहे. त्या समनामधील अग्रलेखाचे बॅनर शहरातील ठराविक ठिकाणी लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद अशा प्रकारच्या बॅनर मुळे पुन्हा एकदा पेटणार यात शंका नाही.

राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर दिसून आले होते त्यांच्या वक्तव्यनंतर राणेंविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाली असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचं दिसत आहे.

shiv sena ajay boraste has put up banners of article in samana criticizing narayan rane in nashik
नाशिक पोलिसांची राणेना नोटीस; २ सप्टेंबरला राहावे लागणार हजर
shiv sena ajay boraste has put up banners of article in samana criticizing narayan rane in nashik
नाशिक जिल्‍ह्यास अवकाळीची तीन कोटींची मिळाली नुकसानभरपाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()