काय चाललय पक्षात? : धनुष्यबाणासाठी शिवसेनेची लढाई

NMC election latest Marathi news
NMC election latest Marathi newsesakal
Updated on

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) ‘हंड्रेड प्लस’चा नारा देणाऱ्या शिवसेनेत (Shiv sena) राजकीय पडझडीनंतर सन्नाटा पसरला आहे.

बदलत्या राजकीय परिस्थितीत नेते हलत असले तरी शिवसैनिक मात्र जागेवरच आहेत. आता भाजप (BJP) व अन्य पक्ष काय करतात, यापेक्षा धनुष्यबाणाचे चिन्ह आपल्याकडेच राहावे, यासाठी शिवसैनिकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. (Shiv Sena battle nmc election nashik Latest political Marathi news)

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री व डझनभर मंत्री पदे मिळविल्यानंतर शिवसेना व शिवसैनिकांमध्ये ऊर्जा संचारली. शिवसेनेचा वारू चौफेर उधळत असताना नेत्यांच्या भाषा बदलल्या. नाशिक महापालिकेत ‘हंड्रेड प्लस’चा नारा देण्यात आला.

निवडणुका झाल्या. सत्ताधारी भाजप चारीमुंड्या चीत होऊन शिवसेना सत्तेतील असे वातावरण तयार झाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणुका लांबल्या. वेळेत निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित ‘हंड्रेड प्लस’ नसले तरी मतांचा टक्का वाढून काही जागांचा लाभ झाला असता.

मात्र ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी वेगळे चूल मांडत भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. या सरकारला ‘शिंदे सरकार’ म्हटले जाते, शिंदे सरकारने शिवसेना संघटनेलाच आव्हान देत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करताना धनुष्यबाण या चिन्हावरच हक्क सांगितला. त्या अनुषंगाने आता न्यायालयीन लढाई सुरू आहे.

NMC election latest Marathi news
रोजंदारीचे 62 कर्मचारी कायम; मनपातर्फे नियुक्ती पत्र प्रदान

शिवसैनिक सुन्न

शिवसेना फुटली तरी काही अडचण नाही, पुन्हा उभारी घेता येईल. परंतु शिवसेनेच्या चिन्हावर शिंदे गटाने केलेला दावा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. या भूमिकेमुळे शिवसैनिक सुन्न झाले आहेत.

महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना भाजपमध्ये काय चालले किंवा यापूर्वी त्यांनी काय केले, हा विषय सध्या शिवसेनेच्या दृष्टीने बाजूला पडला आहे. मतदारांवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रभाव व विश्‍वास आहे. हे चिन्ह गायब झाल्यावर काय होईल...या विचारात शिवसैनिक आहेत.

"धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचेच आहे आणि शिवसेनेचेच राहणार, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. राजकीय घडामोडी घडत असल्या, तरी शिवसेनेचा कणा बूथप्रमुख व गटप्रमुख आहे. त्यांच्यामार्फत निवडणुकीची तयारी सुरू आहे."

- भाऊसाहेब चौधरी, शिवसेना, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख

NMC election latest Marathi news
10वी, 12वी 17 नंबर फॉर्मची प्रक्रिया उद्यापासून; 24 ऑगस्‍टपर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.