भाजपचा आरोप कोणाच्या नथीतून? - सुधाकर बडगुजर

Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSakal
Updated on
Summary

मला अडचणीत आणण्यासाठी ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंपनीचा सहारा घ्यावा लागतो, हे दुर्दैवी आहे. भाजप नेते कोणाच्या तरी नथीतून तीर मारत आहेत. परंतु शिवसेनेचा धनुष्यबाण पाठीमागून वार करीत नसल्याचा पलटवार शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला.

नाशिक : भूसंपादन व उड्डाणपुलाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष अडचणीत आला असून, त्यातून सैरभैर झालेल्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे दहा वर्षांतील मे. बडगुजर ॲन्ड कंपनीची माहिती मागविली आहे. माहिती मागविणे लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे. परंतु मला अडचणीत आणण्यासाठी ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंपनीचा सहारा घ्यावा लागतो, हे दुर्दैवी आहे. भाजप नेते कोणाच्या तरी नथीतून तीर मारत आहेत. परंतु शिवसेनेचा धनुष्यबाण पाठीमागून वार करीत नसल्याचा पलटवार शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. (Shiv Sena city chief Sudhakar Badgujar has replied to BJP)

भाजप व शिवसेनेतील शाब्दिक युद्धात भाजपने मे. बडगुजर ॲणन्ड कंपनीच्या दहा वर्षांतील व्यवहारांची माहिती मागविल्यानंतर नगरसेवक बडगुजर यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, की मे. बडगुजर ॲन्ड कंपनी व माझ्या संबंधांबाबत अनेक वेळा तत्कालीन आयुक्तांनी ‘इन कॅमेरा’ चौकशी केली आहे. इन्कम टॅक्स, सेल टॅक्स व सर्व बँकांचे व्यवहार तपासण्यात आले आहेत. परंतु चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. महापालिका निवडणूक लढविण्यापूर्वी रजिस्टर कागदपत्राच्या आधारे निवृत्ती घेतली आहे. या कंपनीचा २००६ पासून माझा कुठलाही आर्थिक संबध नाही. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांचे किती लोकांचे ठेक्यांशी संबंध आहेत, किती जणांचे स्वतःच्या कंपनीद्वारे भूसंपादन झाले व किती लोकांना ठेके दिले, याचा हिशेब आमच्याकडेसुद्धा आहे. तो निवडणूक काळात निश्चितपणे जनतेसमोर मांडू. त्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही.

Sudhakar Badgujar
लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी २ महिला अधिकाऱ्यांची निवड

महापालिकेने सर्व्हे क्रमांक २९५ व रेल्वेच्या भूसंपादनापोटी टीडीआर दिला आहे. शासन नियमानुसार ७५ टक्के रक्कम महापालिकेकडे वर्ग न करता तिचे भूसंपादन केले आहे. शासनाची चौकशी सुरू असताना त्याच व्यक्तीच्या नावे भूसंपादन प्रस्ताव मंजूर केले आहेत. ही बाबसुद्धा शासनाच्या निदर्शनास आणून देऊ.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

(Shiv Sena city chief Sudhakar Badgujar has replied to BJP)

Sudhakar Badgujar
नाशिकच्या पंधरावर्षीय निखिलला स्पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()