येवला : तालुका व शहर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात शिवसेनेच्या नव्या जुन्या चेहऱ्यांना विविध पदांवर संधी दिली आहे. यापूर्वी शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे यांची विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाली.
तालुक्यातील सर्व गणा-गटातील कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. या माध्यमातून पक्षीय संघटन वाढवून विस्तारासाठी मोठा फायदा होणार आहे. (Shiv Sena executive committee announced Opportunities for many new old workers Nashik Political News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव, उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे.
तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी ग्रामीण भागाचा दौरा करत विविध पक्षातील सक्रिय व होतकरू पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला. नंतर पक्षाची चांगलीच ताकद वाढली आहे.
येणाऱ्या काळात अजून काही चेहरे पक्षांमध्ये येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारिणी जाहीर झाल्यामुळे कार्यकारणीला अजूनच महत्त्व प्राप्त झाले आहे.
यांची झाली नियुक्ती
विधानसभा प्रमुख किशोर सोनवणे, उपजिल्हा प्रमुख अमोल सोनवणे, उपतालुका प्रमुख शरद कुदळ, प्रवीण आहेर, किरण निकम, संतोष वल्टे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख किरण आवारे, उपशहर प्रमुख प्रल्हाद कवाडे, तालुका सहसंघटक सुनील काळे, शहर संघटक राजेंद्र आहेर, शहर समन्वयक सचिन क्षीरसागर, गटसंघटक रावसाहेब पारखे, पाटोदा गणप्रमुख सागर गायकवाड, धूळगाव गणप्रमुख संतोष कदम, गण संघटक रावसाहेब शिंदे, गण समन्वयक राजेंद्र सोनवणे, शाखाप्रमुख उल्हास गायकवाड, अंदरसूल शहरप्रमुख संदीप शेळके, गणप्रमुख किशोर बागूल, उंदिरवाडी गणप्रमुख रवींद्र गायकवाड, राजापूर गटप्रमुख रामदास भागवत, गट संघटक अरुण देवरे, राजपूर गणप्रमुख नवनाथ गुडघे, गवंडगाव गणप्रमुख राजेंद्र जाधव, नगरसूल शहरप्रमुख सजन कुडके, गटसंघटक गणेश कापसे, गणप्रमुख दत्तू फरताळे, नगरसूल गणसंघटक दत्तात्रय शिंदे, मुखेड गटप्रमुख गणेश सोनवणे.
नवनियुक्त कार्यकारिणीचे पालकमंत्री दादा भुसे, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख तथा आमदार सुहास कांदे, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, शहरप्रमुख अतुल घटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले
"येवला तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होत आहेत. प्रथमच सर्व गट-गणासाठी सक्रिय पदाधिकारी मिळाले असून, त्यांच्या माध्यमातून आता गावोगावी शिवदूतांची नेमणूक होऊन सर्वत्र गावात कार्यकारिणी लवकरात जाहीर होईल. तालुक्यात अतिशय प्रभावीपणे पक्ष संघटनेचे काम सुरू आहे."
- पांडुरंग शेळके, तालुकाप्रमुख, शिवसेना, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.