Nashik News : फुटीरांच्या प्रभागात शिवसेनेचे मेळावे; बागूलांच्या नेतृत्वाखाली 25 डिसेंबरपासून मोहीम

Sunil Bagul News
Sunil Bagul Newsesakal
Updated on

नाशिक : मागील आठवड्यात शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सहभागी झालेल्या १३ माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये उपनेते सुनील बागूल यांच्या नेतृत्वाखाली मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गद्दार नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात जाऊन उघडे पाडू, असा निर्धार बागूल यांनी व्यक्त केला. (Shiv Sena gatherings in division ward Campaign from 25 December led by Sunil Bagul Nashik political News)

मागील आठवड्यात शिंदे गटाला नाशिक शहरांमध्ये मोठी शक्ती १३ माजी नगरसेवकांच्या रूपाने प्राप्त झाली. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत १३ माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दृष्टीने शहरात ताकद वाढवण्यासाठी ही घटना परिणामकारक ठरली.

शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी शहरात महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शक्तीप्रदर्शन केल्याने सदरची बाब शिवसेनेला आव्हान देणारी ठरली. त्याअनुषंगाने शिवसेना कार्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात २५ डिसेंबरपासून गद्दार नगरसेवकांच्या वॉर्डात जाऊन त्यांना उघडे पाडायचे असा निर्धार करण्यात आल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी दिली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Sunil Bagul News
Nashik News : 2 महिन्यातच सरपंचासह सदस्यांचे राजीनामे! कारण अद्याप गुलदस्त्यात!

शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, युवासेना जिल्हा संघटक दीपक दातीर, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना गद्दार ठरवत त्यांना धडा शिकविण्यासाठीच त्यांच्याविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली असून त्यात पक्षाचे सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनांच्या सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख बडगुजर यांनी केले.

Sunil Bagul News
Gram Panchayat Election : गोळवाडला 25 वर्षांनंतर निवडणूक; बिनविरोधची परंपरा खंडीत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.