Nashik News : शिवसेना वैद्यकीय कक्षाचा गरजूंना आधार! 4 वर्षांत वैद्यकीय बिलांत मिळाली 75 लाखांची सवलत

medical bill
medical billesakal
Updated on

Nashik News : महाराष्ट्रातील अनेक गरीब कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करणे त्या कुटुंबाला अवघड होऊन बसतं. महागड्या उपचार/शस्त्रक्रियेची गरज असताना त्यासाठी पैसे नाहीत, पण रुग्णावर उपचार तर करायचे आहेत अशा बिकट परिस्थितीत असे कुटुंब होरपळून निघते.

अशा परिस्थितीत गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतनू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सुरु केला आहे. (Shiv Sena medical room support for needy 75 lakhs discount in medical bills in 4 years Nashik News)

शिवसेना वैद्यकिय कक्षाची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १७ नोव्हेंबर २०१७ ला करण्यात आली होती. निफाड येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून निफाड तालुक्यात जवळपास साडेतीन वर्षात निफाड तालुक्यात ७५ ते ८० लाखांची बिलामध्ये सवलत मिळाल्याने रूग्णांचा फायदा झाला आहे.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष चालू करत त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्यावर सोपवण्यात आली. गेल्या एक वर्षात ६७ कोटी रुपयांचे वाटप मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत केले गेले आहे.

त्यातील निफाड तालुक्यातील या कक्षाच्या माध्यमातून ५२ रुग्णांना ४४ लाखांची मदत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे अनिकेत कुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

दुर्धर/गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहाय्य केले जाते. योग्य उपचार घेण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.

धर्मादाय रुग्णालयात निर्धन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या खाटा गोरगरीब गरजूंना उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या रुग्णांना पूर्णपणे मोफत किंवा निम्म्या दरात शस्त्रक्रिया करण्यासाठी शिवसेनेच्या या मदत कक्षातून समन्वयाची भूमिका साधली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

medical bill
Nashik News : वक्फ संस्थाविश्वस्तांना द्यावा लागणार वार्षिक अर्थसंकल्प; 30 दिवसांची मुदत

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शस्त्रक्रिया/उपचार होण्यासाठी पाठपुरावा केला जातो. याशिवाय संबंधित रुग्णालय, गरजू रुग्ण, आणि विविध ट्रस्ट्स यांच्यातील दुवा म्हणून शिवसेनेचा हा कक्ष काम करतो.

"गंभीर आजारी असलेल्या रुग्णास शस्रक्रियासाठी मदत केली जाते. नातेवाईकांनी खर्चास न घाबरता शिवसेना वैद्यकीय कक्षाकडे संपर्क साधावा."- अनिकेत कुटे, शिवसेना वैद्यकीय कक्ष

गरजू रुग्णांसाठी आवश्यक कागदपत्रे:

-आधार कार्ड

-रेशन कार्ड (पिवळे/केशरी)

-उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार प्रमाणित वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयेच्या आत)

-हॉस्पिटल खर्चाचे अंदाजपत्रक

-(अपघातग्रस्त रूग्ण असल्यास पोलिसांचा MLC रिपोर्ट आवश्यक)

medical bill
SAKAL Impact: खेडलेझुंगे गोदापात्रातील हिरव्या रंगाच्या पाण्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतले नमुने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.