'भुजबळ भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे, प्राचार्य' : सुहास कांदे

Suhas Kande And Chhagan Bhujbal
Suhas Kande And Chhagan BhujbalSuhas Kande Vs Chhagan Bhujbal
Updated on

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे तर प्राचार्य आहेत. त्यांच्याशी केवळ डीपीडीसी निधी वाटपापुरताच वाद आहे. महाविकास आघाडीशी याचा संबध नाही. पालकमंत्री म्हणून निधी वळविण्याचा कुठलाही विशेषाधिकार नसतांना त्यांनी येवला मतदार संघात जास्त निधी वळविला तर नांदगाव मतदार संघाला कमी निधी दिला आहे. असा आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी केला.

पालकमंत्री भुजबळ यांच्याशी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार कांदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होते.



कांदे म्हणाले की, सध्याचा वाद महाविकास आघाडीतील नाही हा आघाडीतील नव्हे तर भुजबळ-कांदे यांच्यातील वाद आहे. पालकमंत्री भुजबळ हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असले तरी, त्यांना निधी वाटपाचा आधिकार नाही. निधी वाटपाबाबत बैठक घेउन कृती आराखडा करणे त्याला पून्हा सगळ्या आमदारांची मान्यता घेउन निधीवाटप व्हावे असे संकेत आहे. मात्र श्री भुजबळ यांनी ते संकेतच पायदळी तुडविल्यामुळेच समन्यायी निधी वाटपाच्या मुद्यावर न्यायालयात याचिका केली आहे. निधी वाटपात ८० कोटी येवला मतदार संघाला दिला गेला असतांना नांदगाव मतदार संघाला मात्र अवघा १२ कोटी निधी मिळाला आहे. ठेकेदार पत्र देतात पालकमंत्री शिफारस करतात आणि निधी वितरीत होतो. यात समन्यायी निधी वाटप धोरण पाळले जात नाही.

भुजबळ यांनी आपण भाई विद्यापिठाचा विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट केले. त्याविषयी कांदे म्हणाले की, बरोबरच आहे. भुजबळ हे भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे तर प्राचार्य आहेत. यापूर्वी त्यांच्या विरोधात तशा आशयाच्या तक्रारी त्यांच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला.

Suhas Kande And Chhagan Bhujbal
मी 'भाई' युनिव्हर्सिटीमध्ये गेलो नाही; छगन भुजबळ कडाडले



सांगता येईना, सहनही होईना…

भुजबळ राज्यातील एकत्रित महाविकास आघाडीचे मंत्री असल्याने कांदे यांना अनेक प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडता येत नसल्याची अस्वस्थता अनेक प्रश्नांच्या निमित्ताने दिसली. भुजबळ यांच्याविषयी नाराजी असल्याने त्यांना पालकमंत्री पदावरुन हटविण्याची शिवसेनेची आणि कांदे यांची मागणी आहे का, मुख्यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी पालकमंत्री बदलावे का, शिवसेनेची नेमकी भूमिका काय अशा प्रश्नाबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करजंकर यांनी कांदे शिवसैनिक असल्याने त्यांच्या वर अन्याय होत असल्यास पक्ष त्यांच्या मागे आहे अशा त्रोटक शब्दात भूमिका मांडली. भुजबळांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टिका करणे टाळले. शिवसेनेला भुजबळांवर टिका करणे अवघड जात असल्याने सांगता येईना अन सहनही होईना अशी महाविकास आघाडीतील अस्वस्थता दिसली.

Suhas Kande And Chhagan Bhujbal
भुजबळ-कांदे यांच्यात पॅचअप; कलेक्टरांच्या मध्यस्थीने मिटला वाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.