Dhule News : ‘टक्केवारीच्या भिंती’तून शिवसेनेचे लक्षवेधी आंदोलन; अभियंत्यांचे निलंबन करण्याची मागणी

Dhule News
Dhule Newsesakal
Updated on

धुळे : शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळील संरक्षक भिंत कोसळून सहा दिवस लोटल्यानंतरही धुळे महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रविवारी (ता. १५) पुन्हा अनोखे आंदोलन करून लक्ष वेधले. संबंधित भिंतीवर ‘शहराचा विद्रूप विकास टक्केवारीची भिंत’ असा मजकूर लिहून कारवाईची मागणी केली.

Dhule News
Dhule News : पिसाळलेल्या कुत्र्याने 8 -10 बालकांना घेतला चावा; लहान मुलांवर ‘संक्रांत’

धुळे महापालिकेतील विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत असून, विकासाच्या नावाखाली टक्केवारी संप्रदाय वाढत चालला आहे. या भ्रष्टाचारात मनपा प्रशासनातील प्रमुख अधिकारीदेखील टक्केवारीच्या माध्यमातून मलिदा खाण्यात मग्न आहेत.

त्यामुळे विकासकामे एस्टिमेटनुसार होत आहेत की नाही, निविदा मंजूर झाल्यानंतर कोणत्या ठेकेदाराने काम घेतले, ते कधी सुरू केले, कधी संपले याचे सोयरसुतक नसलेले ओव्हरसिअर फक्त बिल मंजूर फाइल टेबलावर आल्यावर त्या कामातून मिळणाऱ्या टक्केवारीतून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.

कामांवर भेट न देता, कामांची गुणवत्ता न तपासता शेकडो कोटींची कामे प्रशासनाचा अंकुश नसल्याने बिनबोभाट पद्धतीने सुरू आहेत, असा आरोप शिवसेनेने केला.

Dhule News
Dhule News : धुळे पोलिसांवर गुरे हाकण्याची वेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही ‘खो’

कारवाईची मागणी

गेल्या पाच दिवसांपासून सतत रस्ता, गटारी, संरक्षण भिंत, स्ट्रीट लाइट आदी विविध कामांमध्ये धुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत शिवसेना धुळे महानगरतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेने भ्रष्टाचाराचे पुरावे मनपा प्रशासनाला सादरही केले आहेत.

चक्करबर्डी जलकुंभाजवळील संरक्षण भिंत कोसळून सहा दिवस लोटल्यानंतरही मनपा प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ शिवसेना महानगरतर्फे संबंधित संरक्षक भिंतीवर शहराचा विद्रूप विकास टक्केवारीची भिंत-सौजन्य धुळे महानगरपालिका असा मजकूर लिहून अनोखे आंदोलन करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. जोरदार घोषणाबाजी करत, या कामावर लक्ष देणाऱ्या अभियंत्यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली.

Dhule News
Dhule News : भाजप ‘सिरीयस’; शिवसेना आक्रमक!

या वेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, संघटक भगवान करनकाळ, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, देवीदास लोणारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, पंकज भारस्कर, अरुण लष्कर, छोटू माळी, संजय जवराज, महादू गवळी, पिनू सूर्यवंशी, मुरलीधर जाधव, अमोल ठाकूर, योगेश पाटील, गुलाब धोबी, नितीन जडे, लखन चौगुले आदींसह चक्करबर्डी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.