Nashik Market Committee Election : माघारी दरम्यान मनमाडला शिंदे, ठाकरे गटात हाणामारी

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSakal
Updated on

Nashik News : येथे बाजार समितीच्या अर्ज माघारीवरून शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) गटात बाचाबाची होऊन तुंबळ हाणामारी झाली. (Shiv Sena Shinde group and Shiv Sena Thackeray group clashed over withdrawal of market committee application nashik news)

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या समोरच राडा झाल्याने एकच गोंधळ उडाला. गुरुवारी (ता.२०) माघारीच्या दिवशी ८४ एकूण उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली असून ४१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी बाजार समितीच्या कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे अर्ज स्वीकारत होते. अशोक डघळे यांनी दोन जागेवर उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ते बाहेर गावी गेले असल्यामुळे त्यास येता आले नाही.

त्याच्या वतीने त्यांनी त्याची मुलगी आणि अनुमोदक, सूचक यांना पाठवले यावर विरुद्ध पक्षाच्या लोकांनी आक्षेप घेत अर्ज स्वीकारू नये असे सांगत एकमेकांकडे रागाने पाहिल्याचे कारण पुढे करत दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये बाचाबाचीला सुरवात झाली. बाचीबाचीचे रूपांत तुंबळ हाणामारीत झाले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Market Committee Election : मालेगाव बाजार समितीसाठी 47 अर्ज दाखल; भुसे, हिरे पॅनलमध्ये सरळ लढत

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोरच दोन्ही गट एकमेकांना समोरासमोर भिडल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सिद्धार्थ मोरे यांच्या टेबलवर वरती चढून मारामारी करण्यात आली.

त्यामुळे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ घटनास्थळी पोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंह साळवे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत सर्वांना बाहेर काढून दिले. त्यानंतर पुन्हा अर्ज माघारीची प्रक्रिया सुरळीत सुरू करण्यात आली.

८४ उमेदवारांची माघार

मनमाड बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी निवडणूक होत असून या १८ जागांसाठी १२५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. यातून माघारीच्या दिवशी ८४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे ४१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे. माघारीनंतर शुक्रवारी (ता.२१) पॅनल निर्मितीच्या प्रक्रिया सुरू होणार असून लवकरच पॅनलच्या नावाची घोषणा पॅनल प्रमुखांकडून होणार आहे.

आमदार सुहास कांदे यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आपले तुल्यबळ निर्माण केल्यानंतर त्यास कडवी झुंज देण्यासाठी महाविकास आघाडीचे माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अनिल आहेर, जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख हे पाच माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक आमने-सामने येणार आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Market Committee Election: मालेगावला हिरे- भुसे पॅनलमध्ये सरळ लढत; 18 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.