Shiv Sena Shinde Group : भाऊसाहेब चौधरींकडे संघटनात्मक जबाबदारी

MP Shrikant Shinde along with Chief Minister Eknath Shinde giving appointment letter to Bhausaheb Chaudhary.
MP Shrikant Shinde along with Chief Minister Eknath Shinde giving appointment letter to Bhausaheb Chaudhary.esakal
Updated on

Shiv Sena Shinde Group : महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्री. चौधरी यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. (Shiv Sena Shinde Group Organizational responsibility to Bhausaheb Chaudhary nashik news)

नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने संघटनात्मक पातळीवर ताकद वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे विविध पदांवर नियुक्ती केली जात आहे. महिला आघाडी कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली.

त्या व्यतिरिक्त जिल्हाप्रमुख व महानगर प्रमुख या पदांवर महत्त्वाच्या व्यक्तींची नियुक्ती करून संघटना भक्कम केली आहे. आता संघटनेचा अनुभव असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर या पाच जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार देखील चौधरी यांना देण्यात आले आहेत. संघटनात्मक निर्णय, आंदोलने, जनजागृती तसेच संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना श्री. चौधरी यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

MP Shrikant Shinde along with Chief Minister Eknath Shinde giving appointment letter to Bhausaheb Chaudhary.
Satara Politics : सत्तेत असताना जनता नाही दिसली; महेश शिंदेंचा शशिकांत शिंदेंना टोला

राज्य सरकारने घेतलेल्या लोकहितार्थ निर्णयांची माहिती मतदार पोहोचविण्याचे काम देखील सोपविण्यात आले आहे. यापूर्वी भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून काम केले.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन झाल्यानंतर चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये संघटना वाढविण्याचे जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यापासून श्री. चौधरी उत्तम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

"उत्तर महाराष्ट्रात संघटना वाढविण्याचे जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पक्षात नवीन लोकांना जोडण्याबरोबर सरकारने घेतलेल्या निर्णय सर्वसामान्य पोहोचविण्याची जबाबदारी वाढणार आहे." - भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना, शिंदे गट

MP Shrikant Shinde along with Chief Minister Eknath Shinde giving appointment letter to Bhausaheb Chaudhary.
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा भूकंप? पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा शेलारांना फोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.