Thackeray Vs Shinde News: मालेगाव तालुक्यातील पालकमंत्री दादा भुसे व हिरे कुटुंबांमधील राजकीय वाद गतवर्षात अनेकदा चव्हाट्यावर आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिरे यांच्या संस्थेविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अडचणीत आणण्याची खेळी भुसे यांनी खेळल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (Shiv Sena thackeray group vs shinde group clash in Malegaon nashik news)
हिरे-भुसे यांच्या राजकीय संघर्ष सर्वश्रुत असताना पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटासह सत्तेचा मार्ग निवडला. त्यांच्या परतीचे दोर कापण्यासाठीच अद्वय हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अद्वय हिरे यांनी पालकमंत्री भुसे यांना चितपट केले.
होमपीचवर झालेला हा पराभव भुसे यांना चांगलाच जिव्हारी लागला. भुसे यांच्या विरोधातील अँटी इन्कंबंसी मुळे हिरे यांना या मतदारसंघात वाढता प्रतिसाद बघता पडद्यामागे असलेले भुसे थेट हिरे यांच्या विरोधात मैदानात उतरले. त्यातच उद्धव ठाकरे यांची सभा जोरदार झाली.
परिणामी भुसे यांचे आसन काही प्रमाणात डळमळीत झाल्याने भुसे यांनी हिरे यांच्या शैक्षणिक कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरवात केली आहे.
इथवर न थांबता भुसे यांनी सत्तेचा वापर करत हिरेंच्या संस्थेची कारभाराची चौकशी लावली. यापुढे जात, हिरेंच्या संस्थेत झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत चौकशीची मागणी केली.
याच चौकशीत भरती प्रक्रियेत शासनाची फसवणूक झाल्याची उघड झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत, हिरे डोईजड होऊ नये, यासाठी त्यांची कोंडी करण्यासाठीच ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणुकीस वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे हा संघर्ष किती टोकाला जाणार हे बघणे औत्सुकाचे राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.