अखेर सेना पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतलीच!

Shiv Sena workers in Nashik met the state Governor Bhagat Singh Koshyari
Shiv Sena workers in Nashik met the state Governor Bhagat Singh Koshyari Sakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : मुंबईतील एका समारंभामध्ये नाशिकमधील शिवसेनेच्या (Shivsena) मंडळींनी राज्यपाल ( Bhagat Singh Koshnyari) महोदयांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत राजकीय मंडळींमध्ये चांगलीच खुमासदार चर्चा ऐकायला मिळत आहे. राज्यपाल महोदय साहेब! आमच्या जिल्हा प्रमुखांचे नाव तुमच्याकडे असलेल्या विधान परिषदेच्या यादीमध्ये अडकले आहे! तेवढी यादीवर स्वाक्षरी करून जर का ती यादी जाहीर केली तर फार बरं होईल राव..! असंच काहीसं राज्यपाल महोदयांना नाशिकमधील शिवसेनेचे मंडळी तर सांगत नसतील ना ! अशाच काहीशा प्रकारचा आशय सांगणारा व हे ऐकताच तेवढं सोडून बोला राव असं सांगत भेटीचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या याबाबत राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा देखील ऐकायला मिळत आहे. मागील दोन वर्षापासून राज्यातील विधान परिषदेच्या बारा उमेदवारांची यादी राज्यपाल महोदयांकडे स्वाक्षरीविना पडून आहे. त्यामध्ये एक नाव नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचेदेखील आहे. मुंबईत नुकतेच एका सोहळ्यामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांचे दर्शन झाले. त्यांना पाहून शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे व माजी आमदार वसंत गिते यांनी आवर्जून भेट घेतली. राज्यपाल महोदय बसलेल्या सोफ्यावर तेही आसनाधीन झाले. त्यावेळी विविध गोष्टीवर देखील चर्चा झाली. त्या यादीत आमच्या जिल्हाप्रमुखांचेदेखील नाव तुमच्याकडे आहे. तेव्हा त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी पुनश्च एकदा विचार व्हावा, अशीच काहीशी आठवण कदाचित त्यावेळी या मंडळींनी करून दिल्याचे बोलले जात आहे.

Shiv Sena workers in Nashik met the state Governor Bhagat Singh Koshyari
नाशिक | आदिवासी महामंडळ बोगस नोकर भरती प्रकरणी दोघांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.