वाढत्या इंधनदरांविरोधात शिवसेनेचे सायकल चालवा आंदोलन | Nashik

shivsena cycle rally
shivsena cycle rallyesakal
Updated on

नाशिक : 'अच्छे दिन'चा नारा देवून सत्तेवर आलेल्या भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या काळात इंधन आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडल्याने महागाईला प्रोत्साहन मिळाले असून सर्वसामान्य जनता त्यात होरपळत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेटच कोलमडले असून उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवतांना त्यांना अत्यंत कसरत करावी लागते. या गोष्टींकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यास युवासेनेतर्फे रविवारी नाशकात सायकल रॅली काढण्यात आली.

शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून रॅलीस प्रारंभ झाला. इंधन आणि घरगुती गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे, केंद्र सरकार हाय हाय, जनतेला महागाईच्या खाईत ढकलणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, त्रंबक नाका सिग्नल, गंजमाळ सिग्नल आदी मार्गाने काढण्यात आलेल्या रॅलीचे नंतर शिवसेना कार्यालयाजवळ समारोप झाला.

shivsena cycle rally
नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर लाखोंचा सट्टा; दोन बुकी गजाआड

इंधनाचे दर कमी झालेच पाहिजे - बडगुजर

पेट्रोलसाठी 115 तर डीझेलच्या एक लीटरसाठी 105 रुपये मोजावे लागतात. घरगुती गॅस सिलेंडर एक हजाराच्या घरात गेले आहे. त्याने महागाईचा भडका उडाला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काहींचे वेतन कमी झाल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. गॅसची सबसिडी अचानक बंद करुन केंद्राने त्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचे काम केले आहे. लोकांना आता पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे भाग पडत आहे. डिझेल दरवाढीने तर शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आला आहे. या सर्वांच्या वेदना आणि आक्रोशाकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठीच शिवसेनेतर्फे सायकलरॅली काढण्यात आली. त्यानेही निद्रिस्त केंद्र सरकार जागे न झाल्यास शिवसेनेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला.

shivsena cycle rally
शिवसेना आमदाराचा आत्मदहनाचा इशारा

शिवसेना महानगर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, युवासेना संपर्कप्रमुख सिद्धेश शिंदे युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर यांनी रॅलीचे नेतृत्व केले. युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, महानगर युवासेना पदाधिकारी रुपेश पालकर, बालम शिरसाट, यश खैरे युवा सेना संपर्कप्रमुख सिद्धेश शिंदे, जिल्हाधिकारी दीपक दातीर, जिल्हा समन्वयक यश खैरे, समर्थ मुठाळ, शंकर पांगरे, ऋतुराज पांडे, आकाश उगले, महेश मते, कल्पेश पिंगळे, रामदास अहिरे, दीपक भोगे, किरण पाटील, गौरव पगारे, पवन मटाले आदी युवासेना पदाधिकारी सहभागी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()