Shivaji Chumbhale : पकडवॉरंटचा विरोधकांकडून निवडणुकीमुळे अपप्रचार : चुंभळे
Shivaji Chumbhale : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीतील विरोधी गटाचे प्रमुख नेते शिवाजी चुंभळे यांना न्यायालयाने पकडवॉरंट काढल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. विरोधक निवडणुकीच्या तोंडावर स्टंट, अपप्रचार करत असल्याचा आरोप बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे.
आजारपणामुळे मला त्या तारखांना हजर राहता आले नव्हते, त्यामुळे प्रोसेस आहे, असेही ते म्हणाले. (Shivaji Chumbhale statement Arrest Warrant Disinformation by Opponents Due to Elections nashik news)
बाजार समितीच्या निवडणुकीत आजी-माजी खासदार आमनेसामने असून, खरी लढत मात्र पिंगळे व चुंभळे गटात आहे. अद्याप मुख्य प्रचाराला सुरवात नसली तरी निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना ऑगस्ट २०१९ मध्ये ई-नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात विशेष खटला सुरू आहे.
याच प्रकरणात शनिवारी (ता. १५) जिल्हा न्यायालयाने पकडवॉरंट जारी केले आहे. त्यात २६ जून २०२३ ला न्यायालयात हजर होण्याबाबत सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा विरोधकांकडून बाऊ करण्यात आल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
मध्यंतरीच्या काळात आपल्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे तारखांना हजर राहता आले नाही. निवडणुकीच्या तोंडावर पकडवॉरंट जारी झाल्याचा विरोधक फायदा उचलत असून, हा त्यांचा स्टंट असल्याचे चुंभळे यांनी सांगितले. याच प्रकरणातील मुख्य अर्जदार रवी भोये हेदेखील निवडणुकीत माझ्यासोबत आल्याने अपप्रचार करत असल्याचा आरोपही श्री. चुंभळे यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.